आपल्याला माहित आहेच कि बँक म्हटले म्हणजे आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत असलेले एक महत्त्वपूर्ण ठिकाण. जर आपण बँकांचा विचार केला तर खूप वेगवेगळ्या बँका आहेत परंतु यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक भारतातील सगळ्यात मोठी बँक आहे. जर आपण स्टेट बँकेचा विचार केला तर ग्राहकांच्या हितासाठी कायमच आग्रही असलेली ही बँक विविध योजनांच्या माध्यमातून ग्राहकांसाठी बऱ्याच प्रकारच्या संधी निर्माण करून देते.
अशाच पद्धतीची एक व्यवसायाची संधी स्टेट बँकेच्या माध्यमातून सध्या उपलब्ध करण्यात आली असून बेरोजगार युवकांसाठी एक आर्थिक उत्पन्नाचा चांगला स्रोत म्हणून बँकेची ही व्यवसाय संधी लाभदायक ठरू शकते.
नक्की वाचा:एलआयसीच्या 'या' योजनेत फक्त 122 रुपये गुंतवा आणि मिळवा 26 लाख रुपयांचा परतावा
स्टेट बँक ऑफ इंडियाची व्यवसाय संधी
स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएमचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे एटीएमच्या फ्रॅंचायजी संपूर्ण देशात बँकेकडून वितरित करण्यात येत आहेत.
या माध्यमातून तुम्ही जर एसबीआय एटीएम फ्रॅंचायजी घेतली तर तुम्ही महिन्याला चांगल्या पद्धतीने 50 हजार रुपयांपर्यंत तरी कमाई करू शकतात. साहजिकच यासाठी काही अटी आहेत. परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम फ्रेंचायसीच्या माध्यमातून दरवर्षी लाखो रुपये पर्यंत सहज कमी करू शकतात.
या गोष्टींची लागेल आवश्यकता
1- यासाठी तुम्हाला एटीएम साठी 50 ते 80 चौरस फूट जागा असणे आवश्यक असून त्या जागेपासून इतर एटीएम कमीत कमी शंभर मीटर अंतरावर असले पाहिजे.
2- तसेच तुम्ही एटीएम साठीच्या जागेची निवड करायची जागा तळमजल्यावर असणे गरजेचे असून सहज दृष्टीस पडेल अशी असावी. या ठिकाणी 24 तास वीजपुरवठा असावा तसेच एटीएमची दररोजच्या व्यवहार तीनशे पर्यंत व्हायला हवेत. या योजनेमध्ये तुम्ही सहभागी होऊन चांगला रोजगार मिळवू शकतात.
नक्की वाचा:Bussiness For Women: 2 लाख रुपये गुंतवणूक करून घरी सुरू करा 'हा'उद्योग,मिळेल लाखात नफा
Published on: 10 September 2022, 02:03 IST