Others News

नागरिकांना आता कोरोना लसीकरणासाठी व्हाट्सअप वरूनच काही मिनिटांमध्ये नोंदणी करणे शक्य होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

Updated on 25 August, 2021 8:23 PM IST

 नागरिकांना आता कोरोना लसीकरणासाठी व्हाट्सअप वरूनच काही मिनिटांमध्ये नोंदणी करणे शक्य होणार आहे. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

 पुढे बोलताना ते म्हटले की यामुळे नागरी सुविधांच्या एका नव्या युगाचा मार्ग मोकळाझाला आहे. आता मोबाईल फोनच्या माध्यमातून अगदी काही मिनिटांमध्ये लसीकरणासाठी नाव नोंदविता येईल,  असे मांडवी या यांनी ट्विटरवरून म्हटले आहे.

 कशी असेल ही प्रक्रिया?

 लसीकरणासाठी नाव नोंदणी करताना नागरिकांना सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनमध्ये 9013151515 हा क्रमांक सेव्ह करावा लागेल. नंतर तुमच्या व्हाट्सअप द्वारे या क्रमांकावर बुक स्लॉट असा इंग्रजीतूनच मेसेज पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर 16 आंकी ओटीपी येईल. हा आलेला ओटीपी टाकल्यानंतर पिनकोड आणि लसींच्या पर्यायानुसार नागरिकांना जवळच्या केंद्रावर सोयीचे तारीख आणि वेळेनुसार लसीकरणासाठी आपले नाव नोंदवता येईल. सरकारने या मोबाईल क्रमांकावर यापूर्वी लसीकरणाच्या प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.

या नंबर वर काही  आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही मिनिटांमध्ये नागरिकांना पीडीएफ स्वरूपात लसीकरणाचे प्रमाणपत्र प्राप्त होते. सरकारने व्हॉट्सऍप वर ही सुविधा सुरू केल्यानंतर जवळजवळ बत्तीस लाखांवर आधी प्रमाणपत्र या द्वारे डाउनलोड करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षापासून व्हाट्सअप कडून या क्रमांकावर लोकांना कोरोना बाबत योग्य माहिती उपलब्ध करून दिली जात आहे. सरकारने मायगोवकोरोना  हेल्प डेस्क ची सुरुवात मार्च दोन हजार वीस पासून केले होती.

English Summary: you can do registration of covid vacccine by whatsapp
Published on: 25 August 2021, 08:23 IST