Others News

केंद्र सरकारने एक नवीन नियम केला असून या नियमानुसार, आता मतदारांना त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना लिंक करणे आवश्यक आहे. ही लिंक करण्याची जी प्रक्रिया आहेते संबंधित नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

Updated on 20 June, 2022 9:18 AM IST

केंद्र सरकारने एक नवीन नियम केला असून या नियमानुसार, आता मतदारांना त्यांचे आधार कार्ड आणि मतदान कार्ड एकमेकांना लिंक करणे आवश्यक आहे. ही लिंक करण्याची जी प्रक्रिया आहेते संबंधित नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.

सरकारने हा निर्णय घेण्यामागची प्रमुख कारण म्हणजे बऱ्याचदा बोगस मतदानाच्या घटना घडतात, अशा घटनांना आळा घालता यावा यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे.

या नवीन नियमानुसार 1 एप्रिल 2023 पर्यंत ज्यांची नावे निवडणूक आयोगाच्या यादीत असतील त्यांना त्यांचा आधार क्रमांक निवडणूक आयोगाला सांगावे लागणार आहे.यामुळे डबल वोटिंग सारखे प्रकार थांबायला मदत होईल.

जर एखाद्या व्यक्तीला आधार नंबर द्यायचा नसेल तर त्याला त्याच्याकडे आधार कार्ड नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. त्यानंतर मतदारांना 11 पैकी कोणत्याही एका कागदपत्रांद्वारे मतदार ओळखपत्र पडताळणी करावी लागणार आहे

यांनी याबाबत विस्तृत प्रकारच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येणार आहेत. या लेखामध्ये आपण आधार कार्डला मतदार कार्ड कसे लिंक करावे याची माहिती घेऊ.

नक्की वाचा:भारत-बांगलादेश मॅंगो डिप्लोमसी! बांगलादेशी पीएमनी पाठवले एक मेट्रिक टन आंबे, राष्ट्रपती कोविंद- पीएम मोदींना खास भेट

 आधार कार्डला वोटर आयडी लींक करण्याची प्रक्रिया

1- सगळ्यात अगोदर मतदारांनी https://voterportal.eci.gov.in/dashboard या संकेतस्थळावर जावे.

2- या वेबसाईटवर जा तुमच्या अगोदर अकाऊंट असेल तर लोगिन करायची गरज नाही परंतु अकाउंट नसेल तर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी 'क्रीएट अकाऊंट' या पर्यायावर क्लिक करून नवीन अकाउंट साठी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

3- या नवीन अकाउंट ची नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमचा ई मेल अथवा तुमचा वोटर आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाईप करुन लॉग इन करू शकता.

4-त्यानंतर तुमच्या राज्य,तुम्ही राहात असलेला जिल्हा आणि इतर आवश्यक माहिती भरावी. यानंतर सर्च या बटनावर क्लिक करून इतर डेटा समाविष्ट करून 'फिड आधार नंबर' वर क्लिक करावे. यानंतर सबमिट वर क्लिक करून आधार आणि वोटर आयडी लींक करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

नक्की वाचा:आता बोगस मतदार ओळखपत्रांचा होणार पर्दाफाश; निवडणूक प्रक्रियेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

5-यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे,ज्या मतदारांना आधार कार्डला वोटर आयडी कार्ड लिंक करायचे नसेल किंवा काही लोकांकडे आधार कार्ड नाही त्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 अंतर्गत मिळालेले जॉब कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट,

हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, पेन्शन सर्टिफिकेट, सरकारी सेवा ओळखपत्र, आमदार वा खासदार यांनी प्रमाणित केलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय मंत्रालयाने दिलेल्या युनिक आयडी कार्ड,  तुमचे बँकेचे पासबुक( फोटो असलेले) इत्यादी कागदपत्रांद्वारे आपले वोटर आयडीकार्ड ची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांना अपघातसमयी भक्कम आर्थिक आधार देणारी 'ही' योजना आहे खूपच उपयुक्त, वाचा या योजने बद्दल सविस्तर माहिती

English Summary: you can adhaar card and voter id link with use of this online process
Published on: 20 June 2022, 09:18 IST