समाजातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि सफाई कर्मचाऱ्यांकरिता कौशल्य विकास योजना सुलभ व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने 7 ऑगस्ट रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री वीरेन्द्र कुमार यांनी हे पोर्टल लॉंच केले होते.
पंतप्रधान दक्ष आणि कुशल संपन्नता हितग्राही योजना सामाजिक न्याय आणि हक्क मंत्रालयाकडून 2020-21 पासून लागू करण्यात येणार आहे.या योजनेच्या माध्यमातून योग्य लोकांना या संदर्भातील सर्व प्रशिक्षण दिले जाईल.आता या पोर्टल द्वारे कोणत्याही व्यक्तीलाकौशल्य विकास प्रशिक्षणसंदर्भातील कोणतीही आवश्यक माहिती मिळवता येणार आहे.त्याचप्रमाणे या प्रशिक्षणासाठी अगदी सहज अर्जही करता येणार आहे.
काय आहे पीएम दक्ष योजना?
या योजनेअंतर्गत पात्र लक्ष गटांना कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्यसुधारणा,अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम,दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आणि उद्योजकता विकास कार्यक्रम प्रदान केले जाणार आहेत.यासाठी पीएम दक्ष पोर्टल आणि ॲप फायदेशीर ठरणार आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये
केंद्रीय सामाजिक न्याय आणि हक्क मंत्री वीरेन्द्र कुमार म्हणाले होते की काही प्रमुख वैशिष्ट्य मध्ये अनुसूचित जाती, मागासवर्गीय आणि सफाई कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकासाशी संबंधित सर्व माहितीची उपलब्धता समाविष्ट आहे.
तसेच संबंधित प्रशिक्षण संस्थेत नोंदणीची सुविधा आणि एखाद्याच्या आवडीच्याकार्यक्रमानुसार रजिस्ट्रेशन सुविधांचा समावेश आहे.वैयक्तिक माहितीशी संबंधित कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा,प्रशिक्षण कालावधी दरम्यान चेहरा आणि डोळा स्कॅनिंग द्वारे आपली उपस्थिती नोंदणीची सुविधा आणि प्रशिक्षण दरम्यान फोटो आणि व्हिडीओ क्लिप द्वारदेखरेख इत्यादी सुविधांचा समावेश आहे.
Published on: 25 August 2021, 01:00 IST