येझदी रेंज एक अष्टपैलू बाईक होती. 1970च्या दशकात तरुणांमध्ये क्लासिक जावा आणियेझदीया बाईक्सची धम्माल तर होतेच परंतु मोठी क्रेझदेखील होती. आता यामध्ये महिंद्रा च्या मदतीने नवीन मॉडेलयेझदीरोड किंग आज लॉन्च होणार आहे.या बाईक 1960च्या उत्तरार्धामध्ये भारतातील बाजारपेठेत आल्या होत्या व त्यांच्या लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात पर्यंत या बाइक्स ची निर्मिती सुरू राहिली. येझदी रेंज ही अशीच एक अष्टपैलू बाइक होती तिच्यामध्ये रोड किंग, क्लासिक, सिएलll, मोनार्क इत्यादी बाइक्सचा समावेश असायचा. झाल्यानंतर तिची टक्कर रॉयल एनफिल्ड च्या ऑफ रोड बाइक सोबत होऊ शकते.
या बाईक्सचे महत्त्वाचे वैशिष्ट्य
- येझदी रोड किंग मध्ये 334 सिंगल सिलेंडर इंजिन मिळू शकते.
- इंजिन 30 bhp कमाल पावर आणि 32.74 Nmपिक टॉर्क जनरेट करेल. यामध्ये ग्राहकाला 6-speed गिअरबॉक्स मिळू शकतो.
- या बाईकला समोर 21 इंच स्पोक विल आणि मागील बाजू 17 इंच व्हील मिळेल.
- तसेच दोन्ही बाजूस डिस्क ब्रेकहीअसतील.
- या गाडीची किंमत एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत असू शकते.
- क्लासिक लेजेंडने पूर्वीची झेक ब्रँड जावा पुन्हा लोकांमध्ये आणून भारताला एक नवीन ओळख दिली आहे.
Published on: 13 January 2022, 05:24 IST