काल दुपारपासून अचानक सोशल मीडियावर एक अफवा फिरू लागली होती. ती अफवा म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक,औरंगाबाद आणि पुणे या जिल्ह्यांमधून नंदी पाणी पिऊ लागल्या च्या बातम्या येऊ लागल्या.
याचा परिणाम असा झाला की काल रात्री उशिरापर्यंत लोकांचा मंदिराकडे दर्शनासाठीचाओघसुरू होता. भगवान महादेवाच्या मंदिरा मध्ये नंदी पाणी पिऊलागल्याचे कळल्यानंतर महिलांनी मंदिरे गाठली. चमच्याने पाणी भरून नंदीच्या तोंडाला पाणी लावताच ते शोषले जाऊ लागले.त्याच्या पाहता पाहता ध्वनिचित्रफिती देखील व्हायरल झाल्या. असाच अफवेचाप्रकार सप्टेंबर 1995 साली घडला होता. तेव्हाही गणपती दूध पिऊ लागल्याचे अफवा पसरल्याने पाहता-पाहता मंदिर गच्च भरली होती व प्रत्येक जण गणपती मूर्तीला दूध पाजू लागला होता.
काल काहीसा असाच प्रकार घडला परंतु फरक एवढाच होता की 1995 साली गणपती दूध पिण्याची अफ़वाहोती तर काल महादेवाच्या मंदिरातील नंदी पाणी पिऊ लागल्याची अफवा पसरली होती. सोशल मीडियामधून या अफवा पसरल्याने जागोजागी मंदीला पाणी पाजण्यासाठी ग्रामीण भागात देखील रात्री उशिरापर्यंत भरगच्च गर्दी मंदिरांमध्ये होते.
या अफवेबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे स्पष्टीकरण
कोणतीही निर्जीव वस्तू पाणी पीत नाही हे वैज्ञानिक सत्य आहे. नंदीची मूर्ती पाणी खेचते ते केवळ पृष्ठीयताण किंवा सरफेस टेन्शन आणि केस कर्षण या वैज्ञानिक तत्त्वामुळे. जेव्हा समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा पदार्थांच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणू चा असलेला पृष्ठीय थरहा दुसर्या त्याच गुणधर्माच्या थेंबाला स्पर्श केला असता खेचला जातो.
वैज्ञानिक भाषेत याला सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय ताण असे म्हटले जाते अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्यात येत असल्याचे संघटनेचे राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांनी म्हटले.
Published on: 06 March 2022, 11:57 IST