Others News

सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या बाईक्स मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायलेज, स्टायलिस्ट आणि विविध फीचर्स सह उपलब्ध अनेक कंपन्यांच्या बाइक्स सध्या बाजारात विक्रीसाठी आहेत.

Updated on 06 February, 2022 12:51 PM IST

सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या बाईक्स मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायलेज, स्टायलिस्ट आणि विविध फीचर्स सह उपलब्ध अनेक कंपन्यांच्या बाइक्स सध्या बाजारात विक्रीसाठी आहेत.

बाईक सोबतच स्कूटर चा विचार केला तर स्कूटर मध्ये अॅक्टिवा हे सगळ्यात जास्त विकली जाणारी स्कूटर आहे.डिसेंबर 2021 मध्ये या स्कूटरच्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 104,417 युनिट ची विक्री झाली होती. परंतु जर 2020 चा विचार केला तर त्या तुलनेत विक्रित काहीशी घट आली आहे. आता या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या ॲक्टिवा स्कूटर ला टक्कर देण्यासाठी यामाहा मोटार इंडिया लवकरच त्यांची 125 सीसी इंजिन असलेली फॅसिनो आणि Ray ZR अपडेट करून बाजारात आणत आहेत. तसे पाहायला गेले तर या दोघी स्कूटर अगोदर पासून बाजारात आहेत परंतु आता कंपनिया स्कूटर्स ना नवीन अपडेट करून बाजारात आणणार आहे.

एका अहवालानुसार, 2022 चे यामा चे नवीन मॉडेल येणाऱ्या काही महिन्यांमध्ये बाजारात दाखल होणार आहे, परंतु या बाबत कंपनीने अजून कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.यामाहा च्या facino आणि Ray ZR या स्कूटर्स नवीन रंगांच्या पर्यायासह बाजारात आणल्या जाऊ शकतात. या स्कूटर्स वेगवेगळे सीट्स आणि कलर्स व्हील्ससह ऑफर्स केल्या जाऊ शकतात.त्यामुळे त्यांच्या किमती मध्ये देखील वाढ होऊ शकते. आपण या लेखामध्ये  यामाहाच्या या दोघा स्कूटरची  वैशिष्ट्येपाहू.

  • यामाहा फसिनो 125- सध्याच्या यामाहा फसिनो 125 cc सिंगल सिलेंडर इंजिन दिली आहे. जे फ्युएल इंजेक्टेड तंत्रज्ञानावर आधारित आहे.स्कूटरच्या मायलेज बाबत यामाहा दावा करते की,यामाहा फसिनो 125cc स्कूटर 68.75 Kmpl चा मायलेज देते.हे मायलेजARAI द्वारे प्रमाणित आहे.
  • यामाहा फसिनो 125 ची सुरुवातीची किंमत 72 हजार पाचशे रुपये आहे.
  • यामाहा Ray ZR 125- या स्कूटरचा लुक हा स्पोर्टी असून यामध्ये 113 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे.हे इंजिन 7.1 PS कमाल पावर आणि 8.1 Nm पीकटॉर्क जनरेट करते आणि या स्कूटरचे ट्रान्समिशन स्वयंचलित आहे. या कंपनीचा दावा आहे की, स्कूटर 66 Kmpl चे मायलेज देते.
English Summary: yamaha facino 125 and rey zr 125 is compete to honda activa scooter
Published on: 06 February 2022, 12:51 IST