सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे अनेक मोबाईल निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेल्या स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. सध्या स्मार्टफोनचा नाही तर अनेक प्रकारचे चारचाकी आणि दुचाकी वाहनांची देखील रेलचेल पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर स्मार्टफोन निर्मिती कंपनी शाओमीने त्यांचे दोन फ्लागशिप स्मार्टफोन लॉन्च केले असून त्यांचे नाव 12T आणि 12T Pro आहे. या लेखात आपण या दोनही शाओमीच्या स्मार्ट फोनची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.
नक्की वाचा:Gold price today! सोने- चांदीच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या नवीन किंमती...
ही आहेत या दोनही फोनची वैशिष्ट्ये
हे दोन्ही फोन ब्ल्यू, सिल्वर आणि ब्लॅक अशा तीन कलर मध्ये उपलब्ध असून अजून पर्यंत या स्मार्टफोनची विक्री सुरू झालेले नाही. कारण हे स्मार्टफोन जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आले आहेत. या दोन्ही मोबाईलमध्ये 120W चार्जर सह हे दोन्ही मोबाईल एकोणावीस मिनिटात संपूर्ण चार होतील.
12T Pro ची वैशिष्ट्ये
शाओमी च्या या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच AMOLED डॉट डिस्प्ले देण्यात आला असून दोनशे मेगापिक्सल वाइड अँगल, 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल आणि दोन मेगापिक्सल मॅक्रो रिअर कॅमेरा मिळेल. या फोनचा इन डिस्प्ले सेल्फी कॅमेरा 20 मेगापिक्सेलचा आहे.
8 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज तसेच आठ जीबी सोबत 256 जीबी स्टोरेज आणि 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असे तीन रॅम पर्यायांमध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनचे सुरुवातीचे किंमत साठ हजार पाचशे रुपये आहे.
शाओमी 12T
या फोन मध्ये एकशे आठ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला असून मागील कॅमेरा 8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये आठ जीबी रॅम तसेच 128 जीबी स्टोरेज, 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असे दोन प्रकार आता उपलब्ध असून याची किंमत 48 हजार आठशे रुपये आहे.
दोन्ही फोनची इतर वैशिष्ट्ये
या दोन्ही फोनमध्ये इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर आणि एआय फेस अनलॉक सिस्टम आहे. दोघांमध्ये 5000mAh बॅटरी असून 120W हायपर चार्ज देखील मिळेल. हे दोन्ही फोन स्नॅपड्रॅगन 8 +Gen 1 प्रोसेसर वर काम करतील.
या दोन्ही फोन मध्ये बॅटरी, प्रोसेसर तसेच चार्जिंग आणि स्क्रीन समान आहेत परंतु स्टोरेज आणि कॅमेरा तसेच किंमतीत फरक आहे.
भारतात कधी मिळेल?
युरोपियन बाजारांमध्ये 13 ऑक्टोबरपासून स्मार्टफोनची विक्री सुरू होणार असून भारतामध्ये दिवाळीपासून बाजारपेठेत या दोन्ही फोनची विक्री सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Published on: 06 October 2022, 08:09 IST