Others News

Xiaomi ही एक प्रमुख स्मार्टफोन निर्माती कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकत्याच एका स्मार्टफोनची लॉन्चिंग केली. शाओमीने रेडमी 10सी हा बहुचर्चित स्मार्टफोन बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोन विषयी बाजारपेठेत मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. हळूहळू या मोबाईलचे फिचर्स देखील लिक होत होते. मात्र, आता कंपनीने Redmi 10C हा स्मार्टफोन लॉन्च करून टाकला. इंडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन भारतात Redmi 10 या नावाने लॉन्च केला जाणार आहे.

Updated on 13 March, 2022 5:52 PM IST

Xiaomi ही एक प्रमुख स्मार्टफोन निर्माती कंपनी आहे. या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकत्याच एका स्मार्टफोनची लॉन्चिंग केली. शाओमीने रेडमी 10सी हा बहुचर्चित स्मार्टफोन बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या स्मार्टफोन विषयी बाजारपेठेत मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. हळूहळू या मोबाईलचे फिचर्स देखील लिक होत होते. मात्र, आता कंपनीने Redmi 10C हा स्मार्टफोन लॉन्च करून टाकला. इंडिया रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन भारतात Redmi 10 या नावाने लॉन्च केला जाणार आहे.

शाओमी कंपनीने सध्या हा फोन केवळ नायजीरियामध्ये लॉन्च केला आहे. शाओमी नाईजिरियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या फोनची लॉन्चिंग झाल्याची माहिती दिली आहे. हा फोन तीन कलर व्हेरीएंट मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या स्मार्टफोनला नॉच डिस्प्ले, ड्युअल रिअर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले आहे.

Redmi 10C ची किंमत तरी काय?

शाओमी कंपनीने हा स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रीन या तीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 4GB आणि 128GB पर्यंत स्टोरेजसह दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची म्हणजेच 4GB RAM + 64GB स्टोरेजची किंमत N78,000 म्हणजेच भारतीय रुपयात अंदाजे 14,400 रुपये एवढी आहे. आणि या स्मार्टफोनच्या 4GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत N87,000 अंदाजे रुपये 16 हजार एवढी ठेवण्यात आली आहे.

Redmi 10C चे स्पेसिफिकेशन 

नुकत्याच लाँच झालेल्या Redmi 10C स्मार्टफोनमध्ये 6.71-इंच स्क्रीन देण्यात आहे. या मोबाईलची स्क्रीन नॉच स्टाइल डिझाइनसह येते. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरवर काम करतो. या फोनमध्ये स्क्वेअर-आकाराचे कॅमेरा मॉड्यूल डिझाइन देण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील देण्यात आले आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, Realme Narzo 50A मध्ये देखील अशीच रचना बघायला मिळेल. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या प्रायमरी कॅमेऱ्यामध्ये मुख्य लेन्स 50MP ची देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज पर्यायासह येतो.

मिडिया रिपोर्ट्सनुसार, Xiaomi हा फोन Redmi 10 या नावाने भारतात लवकरच लॉन्च करणार आहे. Redmi 10 भारतात पुढील आठवड्यात म्हणजेच 17 मार्च रोजी लॉन्च होणार असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. भारतात लॉन्च होणार आहे हा स्मार्टफोन 50MP कॅमेरा सोबत लॉन्च केला जाणार आहे.  असं असले तरी, कंपनीने Redmi 10C मधील सर्व फिचर्स उघड केलेली नाहीत. तसेच हा स्मार्टफोन भारतात Redmi 10 म्हणून लॉन्च होईल की नाही याची पुष्टी देखील केलेली नाही. मात्र मीडिया रिपोर्टमध्ये हा हँडसेट लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हेही वाचा:-

लई भारी! Redmi चा 108 MP कॅमेरा आणि 8 Gb रॅम असलेला हँडसेट झाला लाँच; किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल, वाह क्या बात है!

खरं काय! 70 हजाराचा iPhone 13 Mini मिळतोय मात्र 45 हजारात; जाणुन घ्या या स्पेशल ऑफर विषयी

Good News: फ्लिपकार्टवर केवळ सहा हजार रुपयात भेटतंय गोदरेजचं फ्रिज; ऑफर संपण्याआधीच करा ऑर्डर

English Summary: xiaomi launch an extraordinary smartphone the smartphone have 50 mp camera and price is to negligible
Published on: 13 March 2022, 05:52 IST