Others News

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः

Updated on 05 June, 2022 12:07 PM IST

अर्थातच भक्ताने देवाला प्रेमाने पत्र, पुष्प, फल, जल अर्पण करावे. ज्या निसर्गाने आम्हांला जीवन जगण्यासाठी समर्थ केले त्याविषयी आदरच नाही तर श्रद्धेने पूजन करणारी आमची भारतीय संस्कृतीची पूजा पद्धती. पर्यावरणाशी तर आमचे अतूट नाते.. अपार श्रद्धा अगदी वेद कालापासून.आम्ही समुद्र, नदी,तलाव याचे पूजन करतो. जल हे तीर्थ मानतो. जगण्यासाठी अन्नद्रव्ये देणाऱ्या भूमातेची चरणधूळ कपाळावर लावतो. या मातीपासून केलेल्या देवाच्या मूर्तीचे पूजन करतो. देवदेवतांना जल अर्पण करतो.

तर श्रीगणेशाला दुर्वा.. जास्वंदी फुले, शंकराला बेल.. लक्ष्मीसाठी झेंडूची फुले.. कृष्णाला तुळस वाहतो. उद्देश सर्वत्र फुलझाडे.. फळझाडे जगवावी. पशुपक्ष्यांचेही वेळोवेळी पूजन करतो. प्राणवायू देणारे वृक्ष तर दारोदारी आहेत.संत साहित्य जन्मले ते निसर्ग सहवासात. जगदगुरु संत तुकारामांनी अभंग रचले भंडारा डोंगरावर. माऊलींचे चैतन्य आजही आहे ते अजानवृक्षाजवळ. असे आमचे पर्यावरणाशी भावनिक नाते आहे.जगदगुरु संत तुकाराम वृक्षवेलींना सोयरे मानतात. मानवी जीवनास संजीवक अशा वृक्षांच्या जोपासनेसाठी निसर्ग संरक्षण, संवर्धन..

संगोपनासाठी श्रद्धेचे कथाभाग जोडून हे निसर्ग पूजनाचे संस्कार रुजविले गेलेत. वृक्ष पानाला आम्ही सोने समजतो.मानवाच्या पहिल्या श्वासापासून जन्मभरच नाही तर जीवनाचा अंत झाला तरीही पर्यावरणाचे भान आम्ही राखतो. असे महत्त्व जाणणारा भारत हा एकमेव देश.भारत सुजलाम सुफलाम राखताना पर्यावरण समतोलासाठी मृदा.. जल.. खनिज आणि उर्जा व्यवस्थापन सातत्याने करतोय. अपारंपारिक ऊर्जेचा नित्य जीवनात वापर वाढवलाय. यामध्ये प्रदूषणाचे भान राखून पर्यावरणपूरक शेती उत्पादनातील इंधनाचे प्रयोग यशस्वी केलेत.

जलविद्युत,पवन उर्जा,सौर उर्जा वापर वाढवलाय. पातळ प्लॅस्टीक बॅगवर बंदी आणलीय. निर्मल जलासाठी नदीसंवर्धन सुरू आहे.पर्यावरण विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केलाय. 'स्वच्छ भारत' हे अभियान सुरू केलंय. लोक सहभागाने पर्यावरण बचाव चळवळ यशस्वी होत आहे.पर्यावरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन पवित्र,उदात्त,निरपेक्ष आणि विशाल आहे.आमचेच नाही तर जगाचे हित बघतो. आमचे पर्यावरण धोरणाचे ध्येय हेच आहे की..सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया,सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना शुभेच्छा !

 

दुर्गासिंग सोळंके NCP बुलढाणा 

English Summary: World Environment Day Special for Determining Environmental Protection
Published on: 05 June 2022, 12:07 IST