Others News

World Athletics Championships: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. त्याने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याने भारताचा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवला आहे.

Updated on 24 July, 2022 10:23 AM IST

World Athletics Championships: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं (Neeraj Chopra) पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. नीरज चोप्राने World Athletics Championship मध्ये भालाफेकीत रौप्य पदक पटकावले. 

नीरज चोप्राने 88.13 मीटर भालाफेक करत पदकाला गवसणी घातली. त्याने भारताचा जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत 19 वर्षाचा पदकांचा दुष्काळ संपवला आहे. विशेष म्हणजे नीरज चोप्राचे हे जागतिक अँथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील पहिलेच पदक आहे.

यापूर्वी त्याने 2016 मध्ये ज्यूनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यानंतर नीरजची ही दुसरी सर्वात चांगली कामगिरी आहे.

Future Numerology: या व्यक्तींच्या आयुष्यात येणार वळण; अंकशास्त्रानुसार पहा तुमचं भविष्य

जागतिक अँथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राच्या कामगिरीकडे लक्ष लागले होतं. काल 88.39 मीटर भाला फेकत भारताचा 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र आज त्याची सुरुवात निराशाजनक झाली. फायनलमध्ये नीरजचा पहिला थ्रो फाऊल ठरला.

शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात पक्षी येताच वाजते घंटा, इंजिनिअरही या जुगाडासमोर फिक्के

या स्पर्धेत नीरज चोप्राला ग्रॅनडाच्या अँडरसन पीटर्सकडून कडवे आव्हान मिळेल, असे मानले जात होते. ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स हा सध्याचा जगज्जेता आहे. या महिन्याच्या सुरुवातीला स्टॉकहोममध्ये नीरज चोप्राला पराभूत करून सुवर्णपदक जिंकताना त्याने यावर्षी तीनदा 90 चा टप्पा ओलांडला होता.

Farming Technique: भारीच की रावं! एकाच शेतातून मिळणार फळे, धान्य, भाजीपाला; जाणून घ्या दुप्पट शेतीच्या खास पद्धती

English Summary: World Athletics Championships: Neeraj Chopra Creates History! India won the medal after 19 years
Published on: 24 July 2022, 10:23 IST