For time being आणि temporary solution म्हणून दिलेली ही जडिबुटी रोगापेक्षा भयानक ठरतेय .. त्यात डिस्ट्रीब्यूटर्स, सर्व्हिस आणि सपोर्ट इंडस्ट्रीज च्या पथ्यावर पडलेलं हे कल्चर त्यांनी आता असंच पुढे न्यायचं ठरवलेलं आहे.. आधी आठ-नऊ तासांच्या कामाच्या वेळा बारा-बारा , सोळा - सोळा तासावर गेल्यात , डिपेंडंसी वाढल्याने सोयीने कॉल्स मिटींगा, 'अरे घरूनच करायचाय अटेंड' म्हणत आलेल्या या कॉल्स ना रात्र नसते अपरात्र नसते रविवार नसतो सुट्टी नसते...घरूनच तर काम करायचंय...आता अशा स्थितीत जॉब जायला नको..मीटर महत्वाचं म्हणत कापून आलेल्या पगारातही दुप्पट तिप्पट मेहनत घेऊन काम करणारी नाईलाजी मानसिकता तयार होत चाललीय.
कंपन्यांनी उपकारार्थ घरी पोहोचवलेल्या लॅपटॉप डेस्कटॉप वर वेबकॅम च्या ऍक्सेससह सगळा डेटा रेकॉर्ड करणारे दुनियाभरचे सर्व्हलन्स टूल्स आणि पॅचेस आहेत.. ज्यावर नजर ठेवून प्रॉडकटीव्हीटी रिपोर्ट रिव्ह्यू केले जातायत .. जे पुरते वाढीव मिळत असल्याने या लॉकडाऊन मध्ये काडीमात्र अफेक्ट न झालेल्या उलट त्याचंच कारण देऊन काम वाढवूनही अगदी सहज पगार कापता आलेल्या , वार्षिक पगारवाढ गिळलेल्या, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशनल कॉस्ट वाचलेल्या, कंपन्यांसाठी लॉकडाऊन म्हणजे घबाड हाती लागल्यासारखी अवस्था आहे... म्हणून त्यांनी अगदी येत्या काळासाठी पंचवार्षिक आराखडाच तयार केलेला आहे...वास्तविक इतर देशात आणि तिथल्या भांडवलशाही कंपन्यानी हे कल्चर एम्प्लॉयींचे हक्क अबाधित ठेवून खूप जाणीवपूर्वक हाताळलेलं आहे लॅपटॉप डेस्कटॉप गरजेच्या इन्फ्रास्ट्रक्चर ची वीज इंटरनेट फोन बिल अशी ऑपरेशनल कॉस्ट शेयर करणं, कामाच्या जादा
वेळांचा मोबदला देणं, प्रॉडकटीव्हीटी रिपोर्ट नुसार अतिरिक्त बोनस देणं अशी सुनियोजित पध्द्त आखूनच हे कल्चर त्यांनी राबवलेलं आहे ...पुढे राबवण्याचं ठरवलेलं आहे...यउलट इथल्या कंपन्यांनी त्याचंच शस्त्र केलंय.. बिझनेस नाही सांगून वाचतंय तितकं वाचवा मिळतंय तितकं ओरबाडून घ्या.. आहेत त्यांना कमी करा.. उरतील त्यांना भीती घाला... जाईल तिथवर ताणत न्या ही पध्दत आणलीय..असो ..पण आज वेळ वाईट म्हणून आधीच रोगाच्या भीतीदायक तणावाखाली असलेली वर्क फ्रॉम होम मूळ आठ बाय दहा च्या भिंतीत वाढलेली बिलं आपल्या कापून आलेल्या पगारातून भरून लॅपटॉप समोर हेडफोन लावून सोळा सोळा तास बसणारी ही
पिढी काही काळ नाईलाजाने कशीबशी तग धरेल पण या corrupt capital version ने हेच कल्चर असंच पुढे नेलं तर काय?लॅपटॉप डेस्कटॉप वर वेबकॅम च्या ऍक्सेससह सगळा डेटा रेकॉर्ड करणारे दुनियाभरचे सर्व्हलन्स टूल्स आणि पॅचेस आहेत.. ज्यावर नजर ठेवून प्रॉडकटीव्हीटी रिपोर्ट रिव्ह्यू केले जातायत .. जे पुरते वाढीव मिळत असल्याने या लॉकडाऊन मध्ये काडीमात्र अफेक्ट न झालेल्या उलट त्याचंच कारण देऊन काम वाढवूनही अगदी सहज पगार कापता आलेल्या , वार्षिक पगारवाढ गिळलेल्या, इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेशनल कॉस्ट वाचलेल्या, कंपन्यांसाठी लॉकडाऊन म्हणजे घबाड हाती लागल्यासारखी अवस्था आहे.आता अशा स्थितीत जॉब जायला नको.. मीटर महत्वाचं म्हणत कापून आलेल्या पगारातही दुप्पट तिप्पट मेहनत घेऊन काम करणारी नाईलाजी मानसिकता तयार होत चाललीय.
Published on: 23 May 2022, 08:57 IST