Others News

भारतात स्त्रियांना विविध क्षेत्रांमध्ये मान मिळू लागला आहे, तसेच कृषीकन्या म्हणून देखील आज मुली नावारूपाला येऊ लागल्या आहेत. 15 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो, विविध उपक्रम देखील राबवले जातात, पण हे सगळे करण्या मागचा हेतू काय असेल असे तुम्हाला वाटते? स्त्री-सशक्तीकरण हा विषय आपल्या कोणासाठीच नवीन नाही, तरीही हल्ली कृषी क्षेत्रात या विषयाची नव्याने उजळणी होताना दिसते, असे का? महिला किसान दिनानिमित्त आपण अश्याच काही बाबींवर प्रकाश टाकणार आहोत.

Updated on 15 October, 2018 8:14 AM IST


भारतात स्त्रियांना विविध क्षेत्रांमध्ये मान मिळू लागला आहे, तसेच कृषीकन्या म्हणून देखील आज मुली नावारूपाला येऊ लागल्या आहेत. 15 ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय महिला किसान दिवस म्हणून साजरा केला जातो, विविध उपक्रम देखील राबवले जातात, पण हे सगळे करण्या मागचा हेतू काय असेल असे तुम्हाला वाटते? स्त्री-सशक्तीकरण हा विषय आपल्या कोणासाठीच नवीन नाही, तरीही हल्ली कृषी क्षेत्रात या विषयाची नव्याने उजळणी होताना दिसते, असे का? महिला किसान दिनानिमित्त आपण अश्याच काही बाबींवर प्रकाश टाकणार आहोत.

भारत जसा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तसाच तो स्त्रीप्रधान देश म्हणून देखील ओळखला जातो (पुरुषप्रधान संस्कृती असली तरीही). तस पाहिलं तर शेतीमध्ये स्त्रियांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना जास्तच होता, आणि अजूनही आहे; नव्हती ती फक्त ओळख! महिला बरोबरीने काम करून शेतीचा डोलारा अगदी सक्षमपणे पेलतात, आपलं घर सांभाळतात आणि अधिक कामांसाठी इतरांच्या शेतांमध्ये रोजगारांवर देखील जातात. इतक सगळं महिला करतात पण या सगळ्याचा मोबदला त्यांना मिळायला हवा तसा मिळत नाही.

आपल्या मुलींवर, महिलांवर जर एखादी शेतीची जबाबदारी टाकली तर आपल्या लक्षात येईल कि ते काम चोखपणे आणि अचूक केले जाते हि स्त्रियांमधील कार्यक्षमता आहे तशीच निर्णयक्षमता देखील आहे, आणि हीच उज्वल भारताची गुरुकिल्ली आहे. आज समाजामध्ये या गोष्टीची जागृती निर्माण होत आहे आणि म्हणूनच 'कृषीप्रधान स्त्री', 'महिला शेतकरी सक्षमीकरण' या सारखे विषय नव्याने आपल्याला पुढे येताना दिसता आहेत. आपले सरकार, तसेच खाजगी कंपन्या महिलांसाठी जातीने नवनवीन योजना आणि उपक्रम अंमलात आणता आहेत.

अजूनही ग्रामीण भागात शहरां इतके स्वातंत्र्य स्त्रियांना मिळत नाही, असे असले तरी या परिस्थिती बदल व्हायला सुरवात मात्र नक्कीच झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या मुलींना-सुनांना प्रोत्साहन देताना दिसतात आणि आपल्याला उमेद आहे ती आपल्या उद्याच्या कृषीकन्येची. आज बऱ्याच महिला पुढाकार घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून स्वतःला सिद्ध करत आहेत. महिलांना-मुलींना योग्य मार्गदर्शन, विषयाची पूरक माहिती आणि प्रोत्साहन दिल्यास त्या स्वतःला सिद्ध करतातच याची अनेक उदाहरणे आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कृषी व्यवसाय आणि कृषी पूरक उद्योग हे दोनही महिला उत्तम प्रकारे हाताळु शकतात यात वादच नाही.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी” या उक्तीप्रमाणे नारीशक्तीने इंटरनेटच्या धावत्या युगात आपल्या कार्याचा ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवला आहे त्यात कृषी क्षेत्रातही त्या मागे नाहीत उदाहरण द्यायचं तर राहीबाई पोपरे ह्या आदिवासी महिला शेतकरी पारंपरिक, देशी बियाण्यांचे संवर्धन करून सीड बँक उभा करून शास्त्रज्ञांना लाजवेल अस काम करते आहेत अशी अनेक उदाहरणे देता येतील गरज आहे ती महिलांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांना साथ देण्याची.

आज महिला किसान दिनी मी सर्व शेतकरी महिलांना, आपल्या कृषिकन्यांना कृषी जागरणाच्या माध्यमातून शुभेच्छा देते. सर्व वडीलधाऱ्या शेतकऱ्यांना आवाहन करते की, आपल्या कुटुंबातील महिलांवर थोडा विश्वास टाका, प्रोत्साहन द्या, संधी द्या, त्या त्यांचाबरोबर तुमच्या आयुष्याचे नक्कीच सोनं करून दाखवतील. भारताचे सोनेरी भविष्य आपल्या शेतकऱ्यांच्याच हातात आहे हे कायम लक्षात ठेवा.

निहारीका कोंढाळकर 
संस्थापक, निसर्गवलय युनीअॅग्रो

English Summary: Women Farmer's Day Special Krishikanya
Published on: 15 October 2018, 07:35 IST