आता बरेच लोक गुगल पे किंवा फोन पे सारख्या साधनांचा वापर करून यूपीआयच्या माध्यमातून अगदी सोप्या व जलद पद्धतीने एकमेकांना पैसे पाठवू शकतात. परंतु बऱ्याच जणांना माहीत नसते की आपण एका दिवसात किती ट्रांजेक्शन करू शकतो. कारण आपल्याला माहित आहेच कि एका दिवसात केवळ बँकेने काही मर्यादेपर्यंतच व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे. परंतु ही मर्यादा वेगवेगळ्या बँकेची वेगवेगळी आहे.
एका नियमानुसार यूपीआयद्वारे जर तुम्हाला पैसे पाठवायचे असतील तर एका बँक खात्यातून दिवसातून दहा वेळा पैसे पाठवू शकते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक परिपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे. आपण काही महत्त्वाच्या बँकांच्या यूपीआय व्यवहार मर्यादा किती आहे याबद्दल या लेखात माहिती.
यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे व्यवहार मर्यादा म्हणजे एकाच वेळी केलेला व्यवहार आणि दैनिक मर्यादा म्हणजे संपूर्ण दिवसाची कमाल व्यवहार मर्यादा हे समजून घेणे महत्वाचे आहे.
कोणत्या बँकेचे किती आहे व्यवहार मर्यादा?
1- स्टेट बँक ऑफ इंडिया- भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असून या बँकेची यूपीआय व्यवहार मर्यादाही एक लाख रुपये असून त्याची दैनंदिन व्यवहार मर्यादा देखील एक लाख रुपये आहे.
2- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँकेची यूपीआय व्यवहार मर्यादा आणि दैनिक व्यवहार मर्यादा दहा हजार रुपये असून गुगल पे वापरकर्त्यांसाठी दोन्ही मर्यादा या पंचवीस हजार रुपये आहेत.
3- बँक ऑफ इंडिया- स्टेट बँक सारखेच बँक ऑफ इंडियाने देखील यूपीआय व्यवहार मर्यादा एक लाख रुपये आणि दैनिक व्यवहार मर्यादा देखील एक लाख रुपये निश्चित केले आहे.
4- एचडीएफसी बँक- ही बँक खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असून या बँकेची यूपीआय व्यवहार मर्यादा एक लाख रुपये आणि दैनंदिन व्यवहार मर्यादा देखील एक लाख रुपये आहे. परंतु या बँकेने नवीन ग्राहकाला पहिल्या 24 तासांसाठी केवळ पाच हजार रुपयांचे व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे.
5- पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँक- पंजाब नॅशनल बँकेचे व्यवहार मर्यादा पंचवीस हजार रुपये असून दैनंदिन यूपीआय व्यवहाराची मर्यादा 50 हजार रुपये निश्चित केली आहे.
6- ॲक्सिस बँक- अॅक्सिस बँकची यूपीआय व्यवहार मर्यादा आणि दैनंदिन मर्यादा या दोन्हीही एक लाख रुपये पर्यंत आहे.
Published on: 05 August 2022, 06:34 IST