Others News

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) उपाययोजना जाहीर केल्या. या अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएममधून (ATM) कार्डशिवाय (कार्डलेस) पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक प्रकारे होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

Updated on 09 April, 2022 11:58 AM IST

मुंबई : डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) उपाययोजना जाहीर केल्या. या अंतर्गत, रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना एटीएममधून (ATM) कार्डशिवाय (कार्डलेस) पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अनेक प्रकारे होणारी फसवणूक टाळता येणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले (Reserve Bank Governor Shaktikant Das), कार्डलेस व्यवहारात एटीएममधून कार्डशिवाय रोख पैसे काढता येणार आहेत. कार्डलेस व्यवहार कमीतकमी १०० रुपये, एका दिवसात जास्तीतजास्त १० हजार रुपये किंवा एका महिन्यात २५ हजार रुपये रोख रक्कम काढता येणार आहे. असे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.

असे काढा पैसे...

कार्डविना एटीएममधून रक्कम काढण्यासाठी मोबाइल अँपचा (Mobile app) वापर करण्यात येणार आहे. ही पूर्ण प्रणाली ओटीपीच्या (OTP) मदतीने काम करते. ओटीपीच्या मदतीनेच मोबाइल अँपच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत.

हे ही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत करा 100 रुपयांचे 16 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार राबवणार सात सूत्री कार्यक्रम; जाणून घ्या सात सूत्र...

सध्या येथे सुविधा

एसबीआय, बैंक ऑफ बडोदा, पीएनबी, एचडीएफसी बैंक, आयसीआयसीआय बँक, ऑक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक (SBI, Bank Of Baroda, PNB, HDFC Bank, ICICI Bank, Axis Bank, Kotak Mahindra Bank, IndusInd Bank) यांच्या एटीएममध्ये सध्या कॅशलेस व्यवहार उपलब्ध आहेत.

English Summary: Withdraw money from ATM without card; RBI's big announcement
Published on: 09 April 2022, 11:57 IST