Others News

सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान व अपडेटेड गोष्टी सातत्याने घडत आहेत. मग ते सीएनजी वाहने असो किंवा इलेक्ट्रिक वाहने यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

Updated on 13 March, 2022 11:32 AM IST

सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान व अपडेटेड गोष्टी सातत्याने घडत आहेत. मग ते सीएनजी वाहने असो किंवा इलेक्ट्रिक वाहने यांची निर्मिती मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.

अशातच केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शनिवारी सांगितले की ऑटोमोबाईल कंपन्या चे जे उच्च अधिकारी आहेत त्यांनी गडकरींना आश्वासन दिले आहे कियेथे सहा महिन्यात फ्लेक्स इंधन वाहनांचेउत्पादन सुरू करतील.

 फ्लेक्स इंधन म्हणजे काय?

फ्लॅक्स इंधन हे इथेनॉल आणि गॅसोलीन किंवा  इथेनॉलचे मिश्रण पासून तयार केलेले पर्यायी इंधन असते. या आधी  टीव्हीएस मोटर आणि बजाज ऑटो सारख्या कंपन्यांनी त्यांच्या आधी दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी हे फ्लेक्स इंजिन तयार करण्यास सुरुवात देखील केली आहे.

फ्लेक्स इंधन वाहन म्हणजे नेमके काय?

 हे एक अंतर्गत ज्वलन इंजिन असून एकापेक्षा अधिक प्रकारच्या इंधनावर चालते.मिश्रित इंधनावर देखीलही वाहने  चालवता येतात.यामध्ये पेट्रोल सोबत इथेनॉल आणि मिथेनॉल  यांचे मिश्रण वापरले जाऊ शकते.फ्लेक्स इंधन खर्च कमी करते त्यासोबत अशा इंधनावर चालणारी वाहने कमी प्रदूषण पसरवतात.अशा परिस्थितीमध्ये सर्व कंपन्यांनी हा उपक्रम सुरू करण्याचे आवाहन देखील केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. इथेनॉल किंवा पेट्रोल वाचवायचा असेल तर फ्लेक्स वाहने बाजारात आणणे फार गरजेचे आहे.

जर जागतिक परिस्थितीचा विचार केला तर जगात अनेक ठिकाणी अशी वाहने बनवली जात आहेत व चालवली देखील जात आहे. भारतामध्ये अजून देखील यांचे उत्पादन सुरू झालेले नाही. FAV अंतर्गत ज्वलन इंजिन द्वारे समर्थित आहे जेगॅसोलीन वर चालते. आशा वाहनांमध्ये 83 टक्‍क्‍यांपर्यंत इथेनॉल इंधनात मिसळले जाऊ शकते.

 फ्लेक्स फ्युएलचा फायदा                                                                         

आपल्याकडे या इंधनाचा वापर वाढला तर खनिज तेलावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.त्यामुळे आपल्या भारताची आयात मोठ्या प्रमाणावर कमी होण्याला मदत होईल.

याशिवाय साखर कारखाने आणि जे शेतकरी ऊस लागवड करतात अशा शेतकऱ्यांसाठी एक फार मोठी सुवर्णसंधी ठरेल. फ्लेक्स इंधनाचा  वापर होऊ लागला तर ही बाब सहज शक्य आहे. काळू पेट्रोल पंप त्यांच्याऐवजी इथेनॉल  पंप दिसू लागणे ही एक काळाची गरज आहे. भारतातील ऊस उत्पादकांसाठी फ्लेक्स फ्युएल हे एक वरदान ठरू शकते.

English Summary: will start flex fuel engine vehicle production start in india that so mant advantage to that vehicle
Published on: 13 March 2022, 11:32 IST