समाजातील बऱ्याच घटकांना मदत व्हावी म्हणून अनेक प्रकारच्या योजना शासनाकडून चालवल्या जातात.जेणेकरून जीवनातील येणाऱ्या समस्या काही अंशी कमी होतील हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे.अशीच एक योजनाविधवा महिलांच्या उदरनिर्वाहासाठी केंद्र सरकारकडून चालवण्यात येते.
या योजनेअंतर्गत विधवा महिलांना आर्थिक मदत म्हणून महिन्याकाठी ठराविक रक्कम दिली जाते. तसेच राज्य सरकारनेही विधवांना आर्थिक मदत देण्यासाठी पेन्शन सुविधेचा लाभ देतात.या योजनेच्या माध्यमातून दिली जाणारी रक्कम थेट लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात पाठवलेजाते.40 ते 59 वयोगटातील विधवा महिलांना या पेन्शन योजनेचा लाभ दिला जातो.या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत,पात्र लाभार्थ्यांना इतर तपशिलांचा बँक खाते नंबर द्यावा लागतो. जेणेकरुन त्याचा लाभ थेट लाभार्थ्यांना देता येईल.
असा करावा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज
- सर्वप्रथम तुम्हाला राज्यानुसार असलेल्या विधवा पेन्शन योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- वेबसाइट ओपन झाल्यानंतर विधवा पेन्शन योजनेच्या पर्यायावर क्लिक करा.
- नवीन पेज उघडल्यावर तुम्हाला अप्लाय नाऊ पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.
- या रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये विचारलेली माहिती पूर्णपणे नोंदवा.
- त्यानंतर सबमीट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- रजिस्ट्रेशनफॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा जेणेकरून भविष्यात त्याचा वापर करता येईल.
तुमच्या अर्जाची स्थिती अशा प्रकारे तपासा
1-सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा.
2-ऑनलाइन स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.
3-पेज ओपण झाल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि त्यावर क्लिक करा.
4- आता योजना निवडा आणि त्यावर क्लिक करा.
5- त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या रजिस्ट्रेशन च्या स्टेटस ची सद्यस्थिती तुमच्या समोरयेईल.
(संदर्भ- हॅलो महाराष्ट्र )
Published on: 06 December 2021, 09:28 IST