Others News

ईश्‍वराने दिलेल्या या शरीराचे मूल्य पैशांमध्ये करता येणेच शक्य नाही.

Updated on 26 May, 2022 8:20 PM IST

ज्यांना घरातील अ‍ॅल्युमिनियमची भांडी एकदम पालटणे शक्य नसेल, ते टप्प्याटप्याने भांडी पालटू शकतात.पूर्वी भारतामध्ये मातीच्या किंवा पितळ्याच्या कल्हई केलेल्या भांड्यांमध्ये जेवण बनवण्याची परंपरा होती. इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियम यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत.विविध आजार बळावतातअ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांवर स्टीलचा साधा चमचा जरी जोरात ओढला, तरी या धातूचे कण बाहेर पडतात.

या भांड्यांत बनवलेले अन्न खाल्ल्यास धातूंचा अंश जेवणातून शरीरात जातो. प्रतिदिन अन्नातून साधारणतः 5 मिलिग्रॅमएवढे अ‍ॅल्युमिनियम सेवन केले जाते.भांड्यातील लोहतत्त्व अन्नात विरघळते लिंबू, टोमॅटो यांसारखे आम्लीय पदार्थ या भांड्यात शिजवले, तर भांड्यातील आयन्स (विद्युत्भारित कण) अन्नात लवकर विरघळतात. असे अन्न शरीरासाठी अपायकारक असते.शरीरात अ‍ॅल्युमिनियमचा साठा मानवी शरीरामध्ये अशा धातूंना बाहेर काढून टाकण्याची मर्यादित क्षमता असते. या क्षमतेच्या बाहेर शरीरामध्ये असे धातू गेल्यास ते मांसपेशी, मूत्रपिंडे, यकृत (लिव्हर), हाडे इत्यादी ठिकाणी हळूहळू साठू लागतात. 

अ‍ॅल्युमिनियम धातू मेंदूच्या पेशींवरही हानीकारक परिणाम करतो. अशा प्रकारे शरीरामध्ये साठत गेलेले अ‍ॅल्युमिनियम स्लो पॉयझन बनते.कुठले आजार होऊ शकतात:-नैराश्य, चिंता, काळजी, स्मृतीलोप, हाडांशी संबंधित आजार, डोळ्यांचे विकार, मूत्रपिंडांची क्षमता घटणे, अतिसार, अतिआम्लता (हायपरअ‍ॅसिडटी), अपचन, पोटदुखी, आतड्याला सूज येणे (कोलायटिस), वारंवार तोंड येणे, इसबसारखे (एक्झिमासारखे) त्वचारोग होतात. अ‍ॅल्युमिनियम हा धातू मेंदूंच्या पेशींवर हानीकारक परिणाम करतो.मातीची व स्टीलची भांडी उत्तम:-मातीची भांडी हा सवोत्तम पर्याय आहे. बाजारपेठेत ही भांडी न मिळाल्यास स्थानिक कुंभाराकडून ती बनवून घ्यावीत.

जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरल्यास शरीराला आवश्यक ती खनिजे जेवणातून मिळतात. मातीच्या भांड्यांत बनवलेल्या जेवणाची चव ज्याने चाखली, तो पुन्हा कधीही इतर भांड्यांचा विचारही करणार नाही.मातीची भांडी वापरणे शक्य नसल्यास तांब्या-पितळ्याची कल्हई केलेली भांडी वापरावीत. ही भांडी आंबट पदार्थांसाठी वापरू नयेत.स्टेनलेस स्टीलची भांडी वापरणे, हा त्यातल्या त्यात सोपा पर्याय आहे. अजूनपर्यंत तरी स्टेनलेस स्टीलचे दुष्परिणाम समोर आलेले नाहीत.इंग्रजांनी भारतीय कैदी लवकर मरावेत यासाठी तुरुंगांमध्ये अ‍ॅल्युमिनियमची भांडी वापरणे चालू केले. आज ही भांडी प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली आहेत. अ‍ॅल्युमिनियम किंवा हिंडालियम यांच्यापासून बनवलेली भांडी आरोग्याला हानीकारक आहेत.

 

Nutritionist & Dietician

Naturopathist

Amit Bhorkar

whats app: 9673797495

English Summary: When using aluminum at home, wait a minute and read
Published on: 26 May 2022, 08:20 IST