महाराष्ट्र शासनामार्फत महाडीबीटी फार्मर पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी चालविण्यात येणारे पोर्टल आहे. या पोर्टलवर शेतकऱ्यांसाठी असलेल्या सगळ्या प्रकारच्या योजना व योजना संबंधीची तपशीलवार माहिती मिळते.
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. या सगळ्या योजना साठी अर्ज करण्यासाठी ची मुदत राज्यशासनाने वाढवली आहे. ती मुदत 31 मार्च 2021 अंतिम आहे. कारण शासनाने चौथ्यांदा सध्या शेतकरी योजनांची मुदतवाढ करून दिली आहे. तरी मुदतीपूर्वी शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घ्यावा. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करून महाडीबीटी पोर्टल वर योजनांसाठी नोंदणी करण्याचे आव्हान महाराष्ट्र शासन कृषी विभागाने केले आहे.
योजनांची तपशीलवार माहिती
फलोत्पादन योजनेअंतर्गत कांदा चाळ, पॅक हाऊस, फळबागांना आकार देणे, फळबाग लागवड, मधुमक्षिका पालन, हरितगृहे, प्लास्टिक मल्चिंग, शेडनेट हाऊस, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत आंबा लागवड,डाळिंब लागवड, मोसंबी लागवड, पेरू लागवड, सिताफळ लागवड इत्यादी इतर फळबाग लागवड योजना, सामूहिक शेततळे
कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत
ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे, प्रक्रिया संच, पावर टिलर, बैलचलित अवजारे, मनुष्य अवजारे, स्वयंचलित अवजारे, कल्टीवेटर, कापणी यंत्र, नांगर, पेरणी यंत्र, मल्चिंग यंत्र, मळणी यंत्र, रोटावेटर इत्यादी साठी शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकता आणि महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करू शकता.
या सगळे योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे
- सातबारा उतारा
- 8अ चा उतारा
- बँकेचे पासबुक
- आधार कार्ड
इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता यांच्यासाठी असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनांचा मुदतीपूर्वी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
Published on: 19 March 2021, 04:45 IST