Others News

बदलत्या जीवनशैलीमुळे आणि काळाच्या ओघात पैशांची गरज ही दिवसेंदिवस अधिक होताना बघायला मिळत आहे. मानवाच्या अन्न वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा भागवण्यासाठी पैशांची नितांत आवश्यकता असते. असे असले तरी, अनेकांना वाढती महागाईमुळे या तीन गोष्टींची पूर्तता करण्यातच नाकीनऊ येत आहेत. अनेक लोक सातत्याने कठोर परिश्रम करत असतात, पैसा मिळवण्यासाठी अहोरात्र काबाडकष्ट करतात मात्र असे असले तरी अनेकांना त्यांच्या कामाचा उचित मोबदला मिळत नाही तर अनेकांना उचित मोबदला मिळतो मात्र पैसा टिकत नाही. एकंदरीत सर्व लोकांची एकच तक्रार असते की अपेक्षित असा पैसा हातात राहत नाही. हातात पैसा टिकत नाही आणि या धावपळीच्या युगात पैशाशिवाय पाणीदेखील मिळत नाही. त्यामुळे या संसारातील प्रत्येक व्यक्ती आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी रोजाना पैशांच्या मागे सुसाट वेगाने धावतो.

Updated on 14 February, 2022 2:32 PM IST

अनेक लोक सांगतात की पैसे काही कुठल्या झाडाला येत नाहीत, आणि पैशाविना मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक दोन वेळचे अन्न देखील मिळू शकत नाही. अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजापासून ते शोकीन वस्तू खरेदी करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी पैसा हा गरजेचा आहे. त्या अनुषंगाने या संसारातील प्रत्येक मानव हा काबाडकष्ट करतो आणि संसारासाठी आवश्यक असणारा पैसा उभारु पाहतो, यामध्ये तो काही प्रमाणात यशस्वी देखील होतो, मात्र संसारात अनेक अडचणी येत असल्याने, अनेक जण केवळ आपला उदरनिर्वाह भागवण्या पुरताच पैसा उपलब्ध करू शकतात. अनेक लोक मोठा पैसा उपलब्ध करतात मात्र त्यांच्या हातात अपेक्षित असा पैसा उरत नाही.

पैशासंदर्भात वास्तुशास्त्रामध्ये अनेक सूचना व उपाय योजना केल्या गेल्या आहेत. संपूर्ण जगात वास्तुशास्त्राचे मोठ्या प्रमाणात पालन केले जाते. आज आपण वास्तुशास्त्रात पैशासंदर्भात सांगितल्या गेलेल्या एका रोपट्याविषयी जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार, मनी प्लांट नावाचे झाड घरात लावल्यास घरात नेहमी आई लक्ष्मीचा वास राहतो, त्यामुळे घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही.

या झाडाला घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा घरात संचार होतो यामुळे घरात सुख शांती नांदते नव्हे नव्हे तर घरातील सर्व सदस्यांचे आरोग्य देखील उत्तम राहत असल्याचे सांगितले जाते. मनी प्लांट हे दिसायला खूपच सुंदर असते, मनी प्लांट घरात लावल्यास घरातील वातावरण स्वच्छ बनते यामुळे घरातील सदस्यांवर सकारात्मक प्रभाव पडतो. मनी प्लांट घरात लावताना मात्र एका गोष्टीची काळजी घेणे अनिवार्य आहे, ते म्हणजे मनी प्लांट हे नेहमी आग्नेय दिशेला ठेवले गेले पाहिजे.

आग्नेय दिशेला मनी प्लांट लावल्यास, मनी प्लांट हे चांगले बहरते. मनी प्लांट घरात असल्यास अशा घरात कधीच पैशांची चणचण भासत नाही. मनी प्लांट असलेल्या घरात साक्षात आई लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अशा घरात चहूकडून पैशांचा वर्षाव होतो, अशा घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असतो त्यामुळे पैशांची देखील मोठ्या प्रमाणात साठवणूक केली जाऊ शकते. मनी प्लांट घरात ठेवल्याने पैशांची कमतरता भासत नाही म्हणून या झाडाला पैशांचे झाड म्हणून देखील संबोधले जाते.

Disclaimer: सदर आर्टिकल मध्ये विहित केलेली माहिती सर्वस्वी इंटरनेटवरून घेतली गेली असून, या माहितीचा उद्देश केवळ लोकांना एक सामान्य माहिती प्रदान करणे एवढाच आहे. सदर लेखात उल्लेख केलेल्या बाबी ह्या लोकांच्या आवडी लक्षात घेता आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखात दिलेल्या कुठल्याही दाव्याची कृषी जागरण मराठी पुष्टी करत नाही. 

English Summary: What is the truth Just keep this 'Ya' tree in the house, there will never be a shortage of money; The mother Lakshmi will remain in the house
Published on: 14 February 2022, 02:32 IST