ग्रामीण भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-नाम पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सरकारने व्यापारी आणि शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आहे. या पोर्टलच्या मदतीने आपण शेताच्या बांधावर बसून आपला शेतमाल विकू किंवा खरेदी करु शकतो. या पोर्टलमुळे खेड्या पाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या पोर्टलच्या मदतीने सर्व प्रकारचा शेतमाल फळे, धान्याची विक्री किंवा खरेदी करता येते. काही दिवसांपुर्वी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यात अजून काही नविन सुविधा जोडल्या आहेत. यातील मंडई आणि बाजारपेठाची संख्या वाढविण्यात आली आहे. देशाच्या कोणत्याही मार्केटमध्ये तुम्ही तुमचा शेतमाल विकू शकता. या पोर्टलचे फायदे काय आहेत, कशी नोंदणी करायची याची माहिती घेणार आहोत.
या पोर्टलमध्ये बऱ्याच पिकांचा समावेश करण्यात आला असून त्यात नव -नवीन पिके समाविष्ट करण्यात येत आहेत. या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना आधुनिक युगाकडे जाण्याची संधी मिळाली आहे. बदलत्या जगात शेतकऱ्यांच्या व्यापाराची स्थितीही यातून बदलणार आहे. आपण आपला शेतमाल थेट बाजार मंडईमध्ये विकू शकणार आहोत. शेतकऱ्यांना घरी बसून आपला शेतमाल कोणत्याही राज्यातील मंडईत विकता येणार आहे, हाच या पोर्टलचा उद्देश असल्याचे सरकारने सांगितले आहे. यात शेतकरी आपल्या मनाने मंडई निवडू शकतील. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील मंडईंचाही समावेश यात करण्यात आला आहे. या पोर्टलचा लाभ फक्त शासन परवाना असलेल्या शेतकऱ्यांना किंवा व्यापाऱ्यांना मिळेल. एकदा का तुम्हाला याचा परवाना मिळाला तर तुम्ही कोणत्याही राज्यातील मंडईमधून शेतमालाची खरेदी-विक्री करु शकता. घरी बसून तुम्ही आपल्या शेतमालाचा व्यापार करु शकता. या पोर्टेलमध्ये शेतमाल बुकिंगही करता येते. या पोर्टेलच्या काही विशेष बाबी आपण मुद्द्यांच्या मदतीने जाणून घेऊ...
- पार्दशक व्यवहार - येथील होणारा व्यवहार हा पार्दर्शक असतो. व्यापारी , शेतकरी आणि मंडईमधील स्पर्धा ही हेल्थी असते. या स्पर्धेचा व्यापारावर सकारात्मक परिणाम होत असतो. शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मधल्या एजंट किंवा कोणी भ्रष्ट व्यापारी येथे नसल्याने येथील स्पर्धा खेळती असते.
- दराविषयी त्वरित माहिती- शेतकरी आणि मंडईतील व्यापाऱ्यांना बाजार त्वरीत मिळतो. ई-नाम पोर्टलवर लॉग इन केल्यास त्यांना बाजारभावाविषयी लगेच माहिती मिळवू शकता.
- दरांची तंतोतत माहिती - कमी दरात शेतमाल घेणाऱे भ्रष्ट व्यापारी शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करत असतात. अशा लोकांपासून हे पोर्टल आपल्याला वाचवते. ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये फसवणुकीच्या गोष्टींना आळा घातला जातो.
- व्यवहार खर्च कमी - राज्यातील सर्व मंडळांना जोडणाऱ्या या केंद्रीकृत ऑनलाइन पोर्टलमार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी व विक्री केली जाते. यामुळे व्यवहारासाठी लागणाऱ्या खर्चात मोठी बचत होते.
- दराची स्थिरता आणि उपलब्धता - या योजनेच्या अंमलबजावणीमुळे दरामध्ये स्थिरता आली आहे. पिकांच्या किंमतीत कोणताच चढ-उतार होणार असा विश्वास शेतकऱ्यांना या पोर्टलमधून देण्यात येतो. फक्त शेतकऱ्यांनाच नाहीतर मंडईतील व्यापारांनाही दराची स्थिरता प्रदान करुन बाजारातील स्थिती स्थिर ठेवते.
- प्रमाणिकरण आणि गोदामाची सुविधा- शेतमाल खेरदी करणार आणि विक्रेत्याला एकत्र आणण्याबरोबर हे पोर्टल अजून एक सुविधा देते. हे पोर्टलवर आपली नोंदणी झाल्यानंतर सरकार आपल्याला आपला शेतमाल गोदामात ठेवण्याची सुविधा पुरवते.
- सुधारित पुरवठा साखळी - पुरवठा आणि मागणी यातील कोणत्याही असमानतेमुळे मंड्यांची पडझड होत असते. प्रत्येक राज्यातील निवडलेली बाजारपेठ एकमेकांशी जोडली जात असून बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या खराब कामगिरीचा परिणाम इतरांवरही होतो. ई-नाम योजनेच्या अंमलबजावणीमुळे केंद्र सरकार वस्तू पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढू शकेल.
- वितरण आणि पेमेंटची गॉरंटी - व्यापारी आणि शेतकऱ्यांमधील आर्थिक व्यवहार हा या पोर्टल द्वारे होत असतो. पिकांचे वेळेवर वितरण करण्याविषयीची खात्री बाळगता येते. याशिवाय शेतकऱ्यांचे पैसे हे ऑनलाईन पद्धतीने थेट त्यांच्या खात्यात जमा होत असतात. यासह शेतकऱ्यांना केलेल्या व्यवहाराविषयीची माहिती तपशील कधीही पाहू येऊ शकते.
कसे जुडणार ई-नाम पोर्टेलशी
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अधिकृत ई-नाम पोर्टलवरच्या या enam.gov.in. संकेतस्थळावर जावे. ज्यांना या पोर्टलमध्ये रुची आहे, त्यांनी नोंदणी करावी. किंवा अर्जदार या http://enam.gov.in/NAM/home/other_register.html. संकेतस्थळावर जाऊनही ई-नामची माहिती मिळवा शकता. पेज ओपन झाल्यानंतर रजिस्टेशन टाईप या पर्यायामध्ये आपला व्यवसाय काय आहे, त्याची नोंद करावी. उदा, आपण शेतकरी आहात तर तेथे असलेल्या “Farmer यावर क्लिक करा. यानंतर आपल्या जवळील कृषी बाजार समिती कोणती आहे. याची नोंद करा. नोंदणी करण्यासाठी ईमेल आयडी द्यावा लागेल. त्यानंर पोर्टलकडून एक आयडी आणि पासवर्ड मिळेल. हा पासवर्ड आपण नंतर बदलू शकता. ई-नामविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण खालील लिंकवर क्लिक करुन माहिती मिळवू शकता. https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.enam&hl=en_IN.
Published on: 06 April 2020, 10:47 IST