Glomus, Gigaspora, Caulospora, Entrophospora Sclerocystis and Scutellospora ह्या जीनस मधिल बुरशी पृथ्वीवर असलेल्या जवळपास 80 टक्के वनस्पतींच्या मुळांसोबत राहुन एक सहजीवी जीवन जगतात.बुरशी आणि उन्नत वनस्पतींच्या मुळांच्या ह्या सहवासास ४०० ते ५०० मिलियन वर्षांचा इतिहास आहे. ग्लोमेरोमायकोटा गटातील ग्लोमस, गिगास्पोरा, अक्युलोस्पोरा, एन्ट्रोफोस्पोरा, स्लेरोसिस्ट आणि स्कटेलोस्पोरा ह्या वर्गातील बुरशी उन्नत पिकांच्या मुळांच्या आत काही अंतरापर्यंत वाढून पिकाकडुन शर्करा आणि अन्नरस मिळवतात, आणि त्या बदल्यात पिकांस प्रामुख्याने आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता करुन देत असतात.
ह्या वर्गातील बुरशींना व्हॅस्क्युलर अर्ब्युस्कुलर मायकोरायझा म्हणजेच व्हॅम असे देखिल म्हणतात. ह्या बुरशी पिकांच्या मुळांच्या वर वाढतात. पिकाच्या मुळांत असलेल्या पेशींच्या आत ह्या बुरशी शिरत नाहीत तर पेशी भित्तिकेच्या आत वाढतात. त्या ठिकाणी ह्या बुरशी काहीशा फुग्याच्या आकाराची वाढ करतात तर काही वेळेस अनेक फांद्या उप फांद्या असल्या सारखी वाढ करतात. मुळांच्या पेशी भित्तिकेत अशा प्रकारे वाढल्यामुळे पेशीतील अन्नरस आणि बुरशीद्वारे जमिनीतुन शोषुन घेतलेला रस, स्फुरद, सुक्ष्म अन्नद्रव्य यांची देवाणघेवाण सहज करणे शक्य होते.ह्या बुरशींच्या मायसेलियम मधुन ग्लोमॅलिन हे एक ग्लायकोप्रोटिन स्रवले जाते जे जमिनीतील सर्वातमोठा कार्बन स्रोत म्हणुन कार्य करते. बुरशी आणि मुळांच्या अशा एकत्र वाढल्याने, मुळांना जमिनीतीलअन्नद्रव्ये प्रामुख्याने फॉस्फोरस चा पुरवठा मुबलक प्रमाणात होतो. शिवाय पिकाच्या पांढऱ्या मुळांपेक्षा देखिल जास्त मोठ्या अशा पृष्ठभागामुळे (Surface area) मायकोरायझा ची बुरशी जास्त प्रमाणात अन्नद्रव्य शोषुन घेवु शकते
पिकाच्या मुळांद्वारा स्रवल्या जाणाऱ्या स्ट्रिगोलॅक्टोन्स मुळे मायकोरायझा च्या बुरशीचे स्पोअर्स रुजण्यास मदत मिळते. जर जमिनीत स्फुरद ची मात्रा कमी प्रमाणात असेल तर मायकोराझा बुरशीची वाढ आणि तिला येणाऱ्या फांद्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. जमिनीत जास्त प्रमाणात स्फुरद (फॉस्फोरस) असल्यास ह्या बुरशीची वाढ थांबते. ह्या मुळेच मायकोरायझा चा वापर आणि त्यापासुन मिळणारे फायदे ह्यावर मोठ्या प्रमाणावर मर्यादा येतात. जमिनीत ३० ppm इतका फॉस्फोरस असल्यानंतर मायकोरायझा ची वाढ काही प्रमाणात कमी होते, तर ३०० ppm पेक्षा जास्त प्रमाणात फॉस्फोरस असल्यानंतर हि वाढ पुर्णपणे थांबुन जाते.
मायकोरायझा च्या वाढीमुळे पिकास जमिनीतील अन्नद्रव्ये भरपुर प्रमाणात तर मिळतातच मात्र त्यासोबतच पिकाचे जमिनीतील हानीकारक बुरशींच्या हल्लयापासुन देखिल रक्षण होत.ह्या शिवाय एक्टोमायकोरायझा असा एक वर्ग आहे जो गुलाब, निलगिरी वै. वनस्पतीच्या सोबत वाढतो. ह्या वर्गातील बुरशींची संख्या हि २००০ पेक्षा जास्त आहे. आणि प्रत्येक बुरशी एका विशिष्ट अशा वनस्पतीच्या मुळांसोबतच सहवास करुन राहते. ह्या गटातील मायकोराझा जगभरातील केवळ ५ टक्के वनस्पतींच्या सोबत राहतात असा कयास आहे.
जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८
प्रतिनिधी - गोपाल उगले
Published on: 30 August 2021, 10:04 IST