Others News

आपल्याला माहिती आहे की शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याला हमीभाव असे म्हणतात.नेमके हमीभाव म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊ. हमीभाव म्हणजे काय? MSP म्हणजेच मराठी याला किमान आधारभूत किंमत असे म्हणतात यालाच हमीभाव असेही म्हटले जाते.

Updated on 28 November, 2021 3:04 PM IST

आपल्याला माहिती आहे की शेतमालाला जी किमान आधारभूत किंमत दिली जाते त्याला हमीभाव असे म्हणतात.नेमके हमीभाव म्हणजे काय? याबद्दल सविस्तर माहिती आपण घेऊ.

 हमीभाव म्हणजे काय?

MSP म्हणजेच मराठी याला किमान आधारभूत किंमत असे म्हणतात यालाच हमीभाव असेही म्हटले जाते.

हमीभावाच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला एका ठराविक किमतीत खरेदी करण्याचे आम्ही देत असते. या हमीभाव प्रणालीच्या माध्यमातून सरकार ज्या शेतमालाची खरेदी करतो त्यामध्ये गहू, ज्वारी,बाजरी, मका, शेंगदाणा, मुग,सोयाबीन आणि कापूस या पिकांचा समावेश आहे. या शेतमालाची हमीभाव खरेदी चे दर सरकार जाहीर करते आणि मग सरकारी खरेदी केंद्रांवर या शेतमालाची खरेदी केली जाते. याचा फायदा असा होतो की बाजारामध्ये शेतमालाच्या किमतीत घसरण जरी झाली तर तेव्हाही केंद्रसरकार ठरवलेल्या हमी भावाने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतात.

हमीभाव कोण ठरवते?

 कमिशन फोर अग्रिकल्चर कॉस्ट अँ डप्राईसेस च्या आकडेवारीवरुन भारत सरकारच्या कृषी मंत्रालय हमीभाव ठरवते. एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातलाहमीभाव संपूर्ण देशात एक सारखा असतो.

हमी भाव कसा ठरवतात?

 यामध्ये आपण जर उदाहरण घेतले तर शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार ही महत्त्वाची घोषणा 2018 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या 50 टक्के नफा हेच हमीभाव सरकार दिल असं जाहीर करण्यात आलं. म्हणजे यामध्ये एक हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर दीड हजार रुपये हमीभाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो. उत्पादन खर्च ठरवत असताना सरकारकडून वेगवेगळे घटक ग्राह्य धरले जातात आणि त्यानुसार उत्पादन खर्चाचे वेगवेगळे प्रकार आहे हे निश्चित करण्यात आलेले आहेत. उत्पादन खर्च ठ रण्यासाठी केंद्रीय कृषिमूल्य आयोगाने काही सूत्र निश्चित केले आहेत.

 उत्पादन खर्च ठरवण्यासाठीचे सूत्रे

  • उत्पादन खर्च ठरवण्याचे -2पहिले सूत्र- या सूत्रानुसार बियाणे, खत,रासायनिक औषध, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो.
  • उत्पादन खर्च करण्याचे दुसरे सूत्र ए-2+ एफ एल( फॅमिली लेबर )-या सूत्रात शेतकरी आणि त्यांच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यमोजले जाते. म्हणजे घरातील व्यक्ती शेतात काम करत असतील तर त्यांचा समाजासाठी खर्च करताना त्याचा विचार केला जातो
  • सी-2( तिसरे सूत्र)- भारतात व्यापक या सूत्रानुसार बियाणे, खते,रासायनिक औषध,मजूर,सिंचन,इंधन,कुटुंब यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचे भाडे निश्चित करून त्या आधारे उत्पादन खर्च ठरवला जातो. उत्पादन खर्च ठरवतांना सी-2 चा आधार घेतला तर कृषी उत्पादनाला अधिक भाव मिळतो.
English Summary: what is meaning of minimum support price?who decide minimum support price?
Published on: 28 November 2021, 03:04 IST