मित्रांनो गांजा आणि भांग यांचे सेवन नशेसाठी फार पूर्वीपासून होत आले आहे. भारतात देखील ह्याचे सेवन हे मोठ्या प्रमाणात केले जाते. पण गांज्याचे सेवन करणे व त्याचे उत्पादन तसे विक्री करणे ह्यावर कायदयाने बंदी आहे मात्र भंगाचे सेवन व विक्री ह्यावर कुठलीही बंदी नाही तसेच भांगाचे विक्रीसाठी सरकारच कॉन्ट्रॅक्ट काढत असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दोघेही नशासाठी वापरले जातात मग एकाची विक्री हि इलीगल आणि एकाची विक्री लिगल असे का? दोन्हीच्या विक्रीच्या बाबतीत हा भेदभाव का? आज कृषी जागरण आपल्या ह्याच प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहे.
मित्रांनो असे सांगितलं जात की, गांजा आणि भांग हे एकाच फॅमिलीमधून येतात. म्हणजे गांजा आणि भांग हे एकाच प्रजातीच्या झाडापासून बनते. परंतु काही लोकांना असे वाटते की हे दोघ वेवगवेगळे आहेत पण तस नाही आहे. हे दोघेच एकाच परिवाराचा भाग आहेत. खरं पाहता, गांजा आणि भांग हे वेगवेगळे आहेत पण आणि नाहीत पण! ते कसं ते जाणुन घ्या. वास्तविक पाहता गांजा आणि भांग हे एकाच प्रजातीच्या झाडापासून बनवतात. ते एका प्रजातीच्या नर आणि मादी वनस्पतीपासून तयार होतात. नर प्रजातीपासून भांग बनवले जाते तर मादी प्रजातीपासुन गांजा बनवला जातो. असे सांगितलं जात की, गांजा आणि भांग जरी एका प्रजातीच्या नर आणि मादी वनस्पतीपासून बनवले जात असले तरी त्याची बनवण्याची प्रोसेस मात्र भिन्न असते.
गांजा हा ह्या प्रजातीच्या फुलापासून बनवला जातो, गांजा चे सेवन हे जाळून त्यांचा धूर घेऊन केले जाते तसेच ह्याचे सेवन अनेक लोक खाण्यात किंवा पिण्यात देखील करतात. गांजा सेवन करणाऱ्या लोकांना लवकर नशा होतो असे सांगितलं जात. तसेच भांग हे केनेबीस नावाच्या झाडाच्या पानापासून बनवले जाते. म्हणजे गांजा हे फुलापासून तर भांग हा पानापासून बनवला जातो.
एकाच झाडापासून दोघांची निर्मिती मग गांजा अवैध का?
आधी गांजाचा वापर देखील अवैध नव्हता ह्याचे सेवन, विक्री, उत्पादन केले जात होते. परंतु 1985 नंतर ह्यावर कायद्याने बंदी घालण्यात आली.
काँग्रेस सरकारच्या काळात, पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी ह्यावर बंदी आणली. तेव्हाची तत्कालीन राजीव गांधी सरकारने NDPS ऍक्ट 1985 संमत करून गांजा च्या सेवन, विक्री, व उत्पादनवर बंदी घातली. खरे पाहता ह्या ऍक्ट नुसार केनेबीस चे फळ आणि फुल ह्यांचा वापर देखील कायद्याने बंद आहे पण भांग हे केनेबीसच्या पानांनी बनते जे की कायद्याने वैध आहे.
माहितीस्रोत टीव्ही9भारतवर्ष
Published on: 28 October 2021, 09:20 IST