पीक कर्ज घ्यायचे म्हणले की शेतकऱ्यांचा कल जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे असतो. शेतकरी पीक कर्ज मध्यम तसेच दीर्घ मुदतीचे घेतात.शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सातबारा उताऱ्यापासून बँकेचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व कागदपत्रे जुळवावी लागतात जे की त्यासाठी वेळही खूप लागतो आणि कर्ज वेळेवर भेटत नाही. शेतकरी वर्गाला वेळेवर कर्ज भेटावे म्हणून कृषी कर्ज मित्र योजना राबिवण्यात आलेली आहे.शेतकऱ्यांना वेळेत कर्ज भेटावे म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी विभाकाकडून कृषी मित्र योजना ला शासनाने मान्यता दिलेली आहे. शेतकऱ्यांना सहजरित्या कर्ज उपलब्ध करून देणे तसेच भांडवलशाही गुंतवणूक वाढवून देणे हाच त्यांचा उद्देश आहे.
कर्जासाठी ‘कृषी कर्ज मित्राची’ आवश्यकता का भासली?
शेतकरी वर्ग रब्बी आणि खरीप हंगाम येण्याच्या तोंडावर पीक कर्ज घेतात. हंगामात बदल करून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करत असतो. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करणे गरजेचे आहे. ही सर्व बाबी लक्षात घेऊन इच्छुक शेतकऱ्यांना कृषी कर्ज मित्र योजना भेटन्यास मान्यता देऊन वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे असा आमचा उद्देश आहे असे सांगितले आहे.
कर्जासाठी ‘कृषी कर्ज मित्राची’ आवश्यकता का भासली?
शेतकरी वर्ग रब्बी आणि खरीप हंगाम येण्याच्या तोंडावर पीक कर्ज घेतात. हंगामात बदल करून जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करत असतो. शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून देण्यास मदत करणे गरजेचे आहे. ही सर्व बाबी लक्षात घेऊन इच्छुक शेतकऱ्यांना कृषी कर्ज मित्र योजना भेटन्यास मान्यता देऊन वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणे असा आमचा उद्देश आहे असे सांगितले आहे.
कृषी कर्ज मित्र योजनेचा उद्देश:
शेतकरी वर्गाला सहजरित्या कर्ज उपलब्ध करून देणे आणि भांडवलशाही गुंतवूनक वाढवून कृषीक्षेत्राचा विकास करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.फक्त भांडवलामुळे शेतकरी पारंपरिक पिकावर जोर देतात त्यामुळे पीक पद्धतीत बदल होणे अशक्य झाले आहे. बँकेचे कर्ज वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत येतो. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जाचा पुरवठा व्हावा म्हणून शासनाने ही योजना काढलेली आहे.
प्रकरण मंजूर करण्यास आकारले जाणारे दर:
अ) अल्प मुदतीचे कर्ज :-
१. पहिल्यावेळी पीककर्ज घेणारा शेतकरी - प्रति प्रकरण सेवाशुल्क 150 रुपये.
ब) मध्यम व दिर्घमुदतीचे कर्ज :-
- नविन कर्ज प्रकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क २५० रुपये.
- कर्ज प्रकरणाचे नुतनीकरण :- प्रति प्रकरण सेवाशुल्क २०० रुपये.
कृषी मित्राचे कसे होते रजिस्ट्रेशन...
१. जे शेतकरी कृषी कर्ज मित्र योजनासाठी इच्छुक आहेत त्यांनी जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन आपली नोंद करावी.
२. नोंद झालेल्या व्यक्तीची यादी तयार होऊन कृषी समितीची मान्यता दिली जाईल.
३. कृषी समितीस जिल्हा परिषद कडील अंतिम निवडीचे अधिकार राहतील.
४. कृषी कर्ज मित्रांनी ज्या शेतकऱ्यांना कृषी कर्ज पाहिजे त्यांना भेटून माहिती द्यावी.
५. कृषी कर्ज आवश्यक असणारी कागदपत्रे जमा करून शेतकऱ्यांनी मंजुरीसाठी बँकेकडे द्यावी.
६. कृषी कर्ज मित्र हा बँक व शेतकरी यांच्या दोघांमधील सहाय्य करणारा व सल्ला देणारा अशी भूमिका बजावेल.
७. कृषी कर्ज मित्राने शेतकऱ्याना पारदर्शी व प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना सहाय्य करावे.
Published on: 25 October 2021, 02:54 IST