आधार कार्ड पॅन कार्ड आणि वोटर आयडी कार्ड म्हणजेच मतदान कार्ड हे काही अशी कागदपत्रे आहेत जी प्रत्येक व्यक्तीकडे असणे आवश्यक आहे. ह्या दस्ताऐवज शिवाय भारतात काहीच पर्याय नाही. हे सर्व डॉक्युमेंट आपल्या ओळखपत्राचे काम करतात शिवाय अनेक सरकारी कामात ह्या डॉक्युमेंटची आपल्याला आवश्यकता भासते. हे डॉक्युमेंट जर आपल्याकडे नसतील तर आपले अनेक महत्वाचे कामे अटकून राहतात तसेच आपल्याला सर्व सरकारी योजनापासून वंचीत राहावे लागू शकते.
मित्रांनो अशा ह्या डॉक्युमेंटची उपयोगिता तर तुम्हाला ठाऊकच आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का, जर एखादा व्यक्ती मरण पावला तर त्याच्या ह्या महत्वाच्या डॉक्युमेंटचे काय होते? तुम्हाला पडलाय ना असा प्रश्न? मित्रांनो आज कृषी जागरण ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आले आहे. चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया मृत व्यक्तींचे आधार, पॅन आणि मतदान कार्डचे मृत्युनंतर काय होते.
मृत व्यक्तीच्या मतदान कार्डचे काय करावे (What to do with a dead person's voting card)
भारतात मतदानाचा अधिकार 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना देण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी आपल्याकडे वोटर आयडी कार्ड असते त्याद्वारे आपण भारतात मतदान करू शकतो. मतदानाव्यतिरिक्त मतदान कार्ड हे एक ओळखीचा पुरावा म्हणुन देखील काम करते. मृत झालेल्या व्यक्तीचे हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट कॅन्सल केले जाऊ शकते. मृत झालेल्या व्यक्तीच्या परिवारातील कोणताही सदस्य हे मतदान कार्ड रद्द करू शकतो त्यासाठी परिवाराच्या कोणत्याही एका सदस्याला मतदान कार्यालयात जाऊन फॉर्म नंबर 7 भरावा लागतो त्यानंतर मतदान कार्ड हे रद्द केले जाते. त्यासाठी मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला सोबत जमा करावा लागतो.
मृत व्यक्तीचे पॅन कार्डसोबत काय करावे (What should be done about the PAN card of the dead person?)
पॅन कार्ड हे वित्तीय बाबीमध्ये सर्वात महत्वाचे आहे. सर्व बँकिंग कामात पॅन कार्ड अनिवार्य आहे. बँकेत खाते खोलण्यासाठी, डीमॅट अकाउंट खोलण्यासाठी, क्रेडिट कार्ड काढण्यासाठी तसेच इतर बँकेच्या सेवेचा लाभ घेण्यासाठी तसेच आयटीआर भरण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. जो व्यक्ती मरण पावतो त्या व्यक्तीचे पॅन कार्ड हे त्या व्यक्तीशी संबंधित सर्व अकाउंट बंद होईपर्यंत सांभाळून ठेवावे. त्यानंतर पॅन कार्ड डिऍक्टिव्हेट करणे गरजेचे आहे.
जर असे केले गेले नाही आणि ते पॅन कार्ड चुकीच्या व्यक्तीकडे गेल्यास मृत व्यक्तीच्या परिवारास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मृत व्यक्तीच्या आधार कार्डचे काय करावे (What to do with the dead person's aadhar card)
मृत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होऊ नये ह्याची खातरजमा करण्याचे काम हे पीडित कुटुंबाची जबाबदारी आहे. आतापर्यंत UIDAI ने असा कोणताही नियम केलेला नाही की मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड रद्द करावे की नाही. म्हणुन सध्या तरी मृत व्यक्तीचा आधार क्रमांक रद्द करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यास त्याबाबतची माहिती संबंधित विभागाला तातडीने देणे आवश्यक आहे.
Published on: 14 November 2021, 07:51 IST