नवी मुंबई: भारतात अलीकडे मोठ्या प्रमाणात बनावट म्हणजेच नकली नोटा बघायला मिळतं आहेत. एवढेच नाही तर काही लोक बनावट नोटा बनवून त्या चालवण्याचा अवैध धंदा करत आहेत. मात्र, ते रोखण्यासाठी शासनाकडून नेहमीच प्रयत्न होत असतात. मात्र असे असले तरी बनावट नोटा बाजारात आल्या असून त्यामुळे सर्वांसाठीच अडचणी निर्माण झाल्या आहेत. काहीवेळा असे घडते की खोट्या आणि खऱ्या नोटा ओळखणे कठीण होते.
साहजिकच तुम्हालाही अशा बनावट नोटेची काळजी वाटत असेल. मात्र, यावरही उपाय उपलब्ध आहे. वास्तविक असे काही अँप्स आहेत ज्याद्वारे तुम्ही खोट्या आणि खऱ्या नोटा ओळखू शकता. हे अँप्स तुम्हाला खोट्या नोटांबद्दल वेळोवेळी अलर्ट करतील आणि त्या ओळखतील.
INR फेक नोट चेक गाईड:
अँड्रॉईड युजर्स हे अँप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हे अँप्लिकेशन मार्गदर्शक म्हणून काम करते. या अँप्लिकेशनमध्ये नोटचा फोटो टाकून ती नोट खोटी आहे की खरी हे कळते. एवढेच नाही तर अँप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीनेचं असा दावा केला आहे. यासोबतच युजरला नोटिफिकेशनद्वारे जागरूकही केले जाते.
Chkfake अँप्लिकेशन:
हे अँप्लिकेशन iOS आणि Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये नोटेचा फोटो अपलोड करावा लागतो आणि हे अँप्लिकेशन नोटेची माहिती गोळा करून निकाल देते. म्हणजेच एकप्रकारे हे अँप्लिकेशन नोटबद्दलच शोध घेते आणि त्यानंतर यूजर्सना सर्व माहिती देते.
Counterfeit money detector:
हे अँप्लिकेशन आंतरराष्ट्रीय अँप्लिकेशन आहे. त्यामुळे हे अँप्लिकेशन चालवण्यासाठी देशाची ओळख प्रविष्ट करावी लागेल. देशाची ओळख प्रविष्ट केल्यानंतर चलनाची माहिती येते. या अँप्लिकेशन मध्ये तुम्हाला अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यामध्येही नोटिफिकेशनद्वारे यूजरला नोटची संपूर्ण माहिती दिली जाते. येथे तुम्हाला केवळ भारताच्या चलनाबद्दलच नाही तर सर्व देशांच्या चलनाची माहिती मिळते.
Published on: 30 May 2022, 10:11 IST