मुंबई : सध्या देशातील नवयुवक नोकरीऐवजी व्यवसायास अधिक महत्व देत आहेत. यामुळे नव युवकांना रोजगाराच्या नवीन संधी देखील उपलब्ध होत आहेत. मात्र व्यवसाय सुरू करणाऱ्या नवीन उद्योजकांना गुंतवणुकीसाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात. मात्र आता व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे व्यवसाय सुरू करणाऱ्यांना मायबाप सरकार नेहमीच मदत करते. आता तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही एमएसएमईंना सरकारने दिलेल्या कर्जाचा म्हणजेच मुद्रा कर्जाचा लाभ घेऊ शकता.
हे कर्ज सूक्ष्म लघु मध्यम उद्योग (एमएसएमई) सुरू करणाऱ्यांना दिले जाते. आता पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक या कर्जाचा लाभ घेऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतात. यामुळे जर तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर निश्चितच आपण या मुद्रा कर्जाचा लाभ घेऊन एखादा भन्नाट व्यवसाय सुरू करू शकता.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की मुद्रा कर्जाअंतर्गत बँक तुम्हाला 50,000 ते 10 लाख रुपयांचे कर्ज देते. आज आपण या कर्जाबद्दल काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. याशिवाय यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा हे देखील आज आम्ही आपणास सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊ याविषयी.
महत्वाच्या बातम्या
Aadhar Card Update : लग्नानंतर आधार कार्डमध्ये या पद्धतीने बदला आपले आडनाव; जाणुन घ्या याविषयी
पीएनबी मुद्रा कर्ज
पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 9.60 टक्के व्याजदराने मुद्रा कर्ज देणार आहे. तथापि, तुमच्या क्रेडिट स्कोअर व्यवसायाच्या स्वरूपानुसार व्याजदर निश्चित केला जाईल. खाजगी मर्यादित कंपन्या, भागीदारी संस्था आणि काही शेतीशी संबंधित व्यवसाय जसे की मत्स्यपालन इत्यादी या कर्जाचा लाभ घेऊ शकतात. हे कर्ज तुम्हाला एकूण 3 प्रकारात मिळू शकते.
पहिला प्रकार आहे शिशु कर्ज योजना, या मुद्रा योजनेच्या कर्ज प्रकारानुसार तुम्हाला 50,000 रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.
दुसरा प्रकार आहे किशोर कर्ज योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते.
तिसरा प्रकार आहे तरुण कर्ज योजना ज्यामध्ये तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळु शकते. मित्रांनो आपणास याविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपण आपल्या जवळच्या पीएनबी बँकात भेट देऊन याविषयी तपशीलवार जाणून घेऊ शकता.
फक्त पीएनबी बॅंकच मुद्रा लोन प्रोव्हाइड करते असे नाही तर इतरही राष्ट्रीयकृत बँका मुद्रा लोन प्रोव्हाइड करतात. यामुळे आपले ज्या बँकेत खाते असेल आपण त्या बँकेला भेट देऊन एकदा निश्चितच मुद्रा लोनविषयी चौकशी करू शकता.
Published on: 02 May 2022, 05:43 IST