Others News

पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय ) संपूर्ण देशात १.१२ कोटी घरे बनवली जाणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ( अर्बन) मिशनच्या अंतर्गत बुकिंग सुरू करण्यात आली आहे.

Updated on 02 September, 2020 5:12 PM IST


पंतप्रधान आवास योजना (पीएमएवाय)  संपूर्ण देशात १.१२ कोटी घरे बनवली जाणार आहेत.  प्रधानमंत्री आवास योजना ( अर्बन) मिशनच्या अंतर्गत  बुकिंग सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे शहरात आपलं घरकूल होण्याचं स्वप्न अवघ्या ३.५ लाखात पुर्ण होणार आहे. साडेतीन लाख रुपयांत आपण घराची बुकिंग करु शकतात. दरम्यान या योजनेच्या अंतर्गत इकनॉमिक्स वीकर सेक्शन (ईडब्ल्यूएस साठी  घराचा रुंदी ही ३० स्क्वॉयर मीटर असू शकते. हा एक कार्पेट एरिया आहे. देशातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या नागरिकांना या योजनेचा फायदा होणार आहे.

दरम्यान योजनेतून पहिल्यांदा घर घेणाऱ्यांना  क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्किमचा ही लाभ मिळतो. यासह व्याजावर अनुदानदेखील मिळते. केंद्र सरकारने या योजनेची मर्यादा वाढवली असून ३१ मार्च पर्यंत २०२१ पर्यत ही योजना वैध असणार आहे. देशातील साधरण २.५ लाख मध्यमवर्गीय नागरीक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. दरम्यान उत्तर प्रदेशच्या हाऊसिंग डेव्हलपमेंट काऊंसिलने ३ हजार ५१६ प्रधानमंत्री आवास योजनेसाठी १९ शहरात एक सप्टेंबरपासून बुकिंग सुरू केली आहे.  यासाठी ऑनलाईन अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत स्विकारले जाणार आहेत.

ज्या नागरिकांचे उत्पन्न हे ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेसाठी पात्र असतील.  दरम्यान २५ जून, २०१५ पासून या योजनेतून देशभरात किमान अडीच लाख नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती सरकार कडून जाहीर केली गेली आहे. या योजनेत कमी उत्पन्न गटातील व्यक्तींना आपले पहिले घर घेताना हे अनुदान दिले जाते.

पंतप्रधान आवास योजनेसाठी अर्ज कसा कराल

प्रधानमंत्री हाऊसिंग स्किमच्या अधिकृत संकेतस्थळ https://pmaymis.gov.in/. लॉगिन करावी. येथे LIG, MIG किंवा EWS पर्याय दिले जातील.  आधार क्रमांकासह इतर माहिती भरल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.  पुढे अर्जाची फी भरावी. हा अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. तर, बँकेत कर्जाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मग ५००० रुपये शुल्क आहे. तीन लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक इन्कम असलेल्यांना या योजनेतून अनुदानाचा लाभ मिळतो. त्यासाठी आपणही आपल्या बिल्डरकडे याबाबतची मागणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरू शकता.

English Summary: What do you say! Our house will be worth only three and a half lakhs; Apply for this scheme quickly
Published on: 02 September 2020, 05:12 IST