Others News

देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणून ओळखली जाणारी हीरो मोटोकॉर्पने महिला दिनानिमित्त एक शानदार ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे हिरो कंपनीने ही ऑफर फक्त महिलांसाठी सुरु केली आहे. जागतिक महिला दिनी सुरू करण्यात आलेल्या या ऑफरनुसार आता देशातील महिला केवळ एक रुपये डाऊन पेमेंट भरून हिरोची कोणतीही स्कूटर खरेदी करू शकतील.

Updated on 09 March, 2022 5:36 PM IST

देशातील अग्रगण्य मोटोकॉर्प कंपनी म्हणून ओळखली जाणारी हीरो मोटोकॉर्पने महिला दिनानिमित्त एक शानदार ऑफर आणली आहे. विशेष म्हणजे हिरो कंपनीने ही ऑफर फक्त महिलांसाठी सुरु केली आहे. जागतिक महिला दिनी सुरू करण्यात आलेल्या या ऑफरनुसार आता देशातील महिला केवळ एक रुपये डाऊन पेमेंट भरून हिरोची कोणतीही स्कूटर खरेदी करू शकतील.

या ऑफरचा उपयोग करून हीरो मोटोकॉर्पची कोणतीही स्कूटर खरेदी केले जाऊ शकणार आहे. हिरो कंपनीच्या जवळपास सर्वच स्कूटरवर ही ऑफर देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त स्कूटर खरेदी केल्यास महिलांना चार हजार रुपयांपर्यंत कॅश बोनस देखील देण्यात येणार आहे. एवढेच नाही तर या कॅश बोनससोबत दोन हजार रुपये लॉयल्टी बोनस देखील मिळू शकतो मात्र, ही एक्सचेंज ऑफर हिरो डेस्टिनी 125 स्कूटर पुरतीच मर्यादित आहे.

हीरो मोटोकॉर्पनुसार, देशातील कोणत्याही महिलेने आपल्या नावावर स्कूटर खरेदी केली तर त्या महिलेस सहा हजार रुपयेपर्यंत या ऑफर अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर हीरो मोटोकॉर्पने ही ऑफर सुरू केली आहे. मात्र ही ऑफर काही निवडक शहरात सुरू आहे

जर आपणास या ऑफरअंतर्गत एक रुपया डाऊन पेमेंट भरून स्कूटर खरेदी करायची असेल तर आपण आपल्या जवळच्या डीलरशी संपर्क साधून या ऑफरविषयी नक्की विचारणा करू शकता. हीरो मोटोकॉर्पने सुरु केलेली ऑफर केवळ 11 मार्च 2022 पर्यंतचं उपलब्ध आहे याची देखील दखल घेणे अनिवार्य राहणार आहे.

English Summary: What do you say Hero's scooter with a down payment of just Rs. 1; Offer for a limited time only
Published on: 09 March 2022, 05:36 IST