पुणे : सकाळपासून सुरू झालेल्या निवडणुकीची नववी फेरी सुरू असून पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आघाडी घेतली आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांनी साडेचार हजार मतांची आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीपासूनच दीड हजार मतांच्यावर आघाडी घेऊन धंगेकर यांनी दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे भाजपला तब्बल 30 वर्षानंतर कसबा हातातून गमाववं लागतं की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने हे निवडणूक लढत आहेत.
कसबा पोटनिवडणुकीत नवव्या फेरीत धंगेकर यांना 34 हजार 778 मते मिळाली. तर हेमंत रासने यांना 30 हजार 272 मते मिळाली आहेत. आनंद दवे यांना 100 मतांवरच समाधान मानावे लागले आहे. नवव्या फेरीत धंगेकर यांना 4506 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे धंगेकर हे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत आहे.
आठव्या फेरीत मतांची बेगमी
कसब्यातून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनीही उडी घेतली होती. मात्र, दवे यांना आठव्या फेरी अखेर केवळ 100 मते मिळाली आहे. धंगेकर यांना आठव्या फेरीत 30 हजार 527 मते मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांनना 27 हजार 187 मते मिळाली आहेत. धंगेकरांनी 3500 मते घेऊन आघाडी केली आहे.
Published on: 02 March 2023, 11:23 IST