नागपुरात व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीसची तस्करी चालू होती. कोट्यावधी रुपयांच्या किमतीचे अंबरग्रीस वनविभागाने जप्त केले आहे. या संपूर्ण प्रकरणात वनविभागाला सापळा रचून चार तस्करांना पकडण्यात यश आले आहे. अंबरग्रीस तस्करीचे धागेदोरे हे चेन्नईपर्यंत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व्हेल माशाची उलटी अर्थात अंबरग्रीसची तस्करी करणारी टोळी नागपुरात असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानंतर टोळीला पकडण्यासाठी वन विभागाने सापळा रचून चार तस्करांना ताब्यात घेतले. नागपुर शहरातल्या गणेशपेठ परिसरातून या चौघांना रंगे हात पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. अरुण गुंजाळ, पवन गजघाटे, राहूल दुपारे व प्रफुल्ल मतलाने या चौघांना ताब्यात घेत त्यांच्याजवळ असलेले दुर्मिळ अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. हे अंबरग्रीस कोट्यावधी रुपयांचे आहे.
या दोषींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे चेन्नईपर्यंत असल्याचे चौकशीतून समोर आले आहे. नागपुरात घडलेली ही पहिलीच कारवाई असल्याचं म्हटलं जात आहे. यामागेही मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. व्हेल माशाची उलटी अतिशय दुर्मिळ गोष्ट असून याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यावधी रुपयांची किंमत आहे.
मुसळधार पावसाचा हाहाकार; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान; रस्त्यावरील गाड्याही गेल्या वाहून
याला दुसऱ्या भाषेत समुद्रातील सोनं किंवा तरंगणारं सोनं असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे याचा महागडे परफ्युम्स आणि औषधांसाठी वापर करण्यात येतो. उलटी व्हेल माशाच्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर समुद्राच्या पाण्यात तरंगते व नंतर सूर्यकिरण आणि समुद्रातील क्षार यांच्यामुळे रासायनिक प्रक्रियेतून त्याचे
अंबरग्रीसमध्ये रूपांतर होते.
महत्वाच्या बातम्या:
सांगा शेती कशी करायची? पाच वर्षात पहिल्यांदाच बियाणे व खतांच्या किंमतीत दुप्पट वाढ; शेतकरी हतबल
महाराष्ट्र दहावी बोर्डाचा असाही एक निकाल; वडील पास तर मुलगा नापास
Published on: 19 June 2022, 05:58 IST