Others News

महाराष्ट्रात फळ पिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन 2011 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2018-19 मध्ये द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू पिकांचा अंबिया बहाराकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना विमा कंपन्यांच्या माध्यमांतून प्रत्येक पिकनिहाय अधिसूचित जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे व नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांस दिली जाणार आहे.

Updated on 03 May, 2021 7:34 AM IST

महाराष्ट्रात फळ पिकांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन 2011 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. सन 2018-19 मध्ये द्राक्ष, संत्रा, मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू पिकांचा अंबिया बहाराकरिता ही योजना राबविण्यात येत आहे. सदर योजना विमा कंपन्यांच्या माध्यमांतून प्रत्येक पिकनिहाय अधिसूचित जिल्ह्यांतील अधिसूचित तालुक्यांमध्ये राबविण्यात येणार आहे व नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांस दिली जाणार आहे.

योजनेची वैशिष्ट्ये:

  • कमी / जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे.
  • फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैैर्य आबधित राखणे.

हेही वाचा:‘या’ कारणांमुळे आंबा उत्पादन कमी होण्याची शक्यता

या योजनेंतर्गत जिल्हानिहाय काम करणाऱ्या विमा कंपन्या पुढीलप्रमाणे:

अ. क्र

समाविष्ट जिल्हे

 विमा कंपनीचे नाव व पता

 

 

समूह १: वाशिम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर व अकोला

 

दि न्यू इन्डिया एश्योरन्स कंपनी
८७, एम जी रोड, फोर्ट, मुंबई
पिन- ४००००१.
फोन नं: ०२२-२२७०८१००
टोल फ्री नंबर: १८००२०९१४१५
ई-मेल: pmfby.ho@newindia.co.in

 २

समूह २: ठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक व हिंगोली

समूह ३: रायगड, धुळे, नागपूर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद व नंदुरबार

समूह ४: बुलढाणा, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड व बीड

अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लि.
मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्स्चेंज टॉवर्स,
२० वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट
मुंबई- ४०००२३.
फोन नं: ०२२-६१७१०९१२
टोल फ्री नंबर: १८००१०३००६१
ई-मेल: mhwbcis@aicofindia.com


या योजनेसाठी विविध वित्तीय संस्थांकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्यांची अधिसूचित फळ पिकांसाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील.
बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील.
योजनेमध्ये सहभागी झालेल्या कर्जदार / बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी या योजेनेतील गारपीट या हवामान धोक्यासाठी सहभाग ऐच्छिक राहील.
शेतकऱ्यांनी भरावयाचा जास्तीत जास्त विमा हप्ता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के किंवा वास्तवदर्शी दर यापैकी जी कमी असेल ती रक्कम.


विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता:

पिक

विमा संरक्षित रक्कम रु

(प्रती हेक्टरी)

विमा दरात शेतकरी हिस्सा रु.

(प्रती हेक्टरी)

द्राक्ष

३,०८,०००/-

१५,४००/-

डाळींब

१,२१,०००/-

६,०५०/-

मोसंबी

७७,०००/-

३,८५०/-

पेरू

५५,०००/-

२,७५०/-

केळी

१,३२,०००/-

६,६००/-

संत्रा

७७,०००/-

३,८५०/-

काजू

८३,६००/-

४,१८०/-

आंबा

१,२१,०००/-

६,०५०/-

लिंबू

६६,०००/-

३,३००/-

 

संबंधित शासन निर्णय पाहण्यासाठी: प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पिक विमा योजना 2018-19 मध्ये अंबिया बहाराकरिता लागू करण्याबाबत 

संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्याने भरावयाचा विमा हप्ता: (ऐच्छिक गारपीटीकरिता)

पिक 

विमा संरक्षित रक्कम रु.

(प्रती हेक्टरी)

विमा दरात शेतकरी हिस्सा रु.

(प्रती हेक्टरी)

द्राक्ष

१,०२,६६७/-

५,१३३/-

डाळींब

४०,३३३/-

२,०१७/-

मोसंबी

२५,६६७/-

१,२८३/-

पेरू

१८,३३३/-

९१७/-

केळी

४४,०००/-

२,२००/-

संत्रा

२५,६६७/-

१,२८६/-

काजू

२७,८६७/-

१,३९३/-

आंबा

४०,३३३/-

२,०१७/-

लिंबू

२२,०००/-

१,१००/-


पीकनिहाय विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत:

  • द्राक्ष: 15 ऑक्टोबर
  • डाळिंब, मोसंबी, पेरू व केळी: 31 ऑक्टोबर
  • लिंबू: 14 नोव्हेंबर
  • संत्रा, काजू: 30 नोव्हेंबर
  • आंबा: 31 डिसेंबर

योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी सादर करावयाची कागदपत्रे:

  • ७/१२ (७/१२ वर फळबागेचा उल्लेख)
  • ८-अ
  • फळबाग लागवड दाखला
  • बँक पासबुक झेरॉक्स
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • संरक्षित रक्कम विमा हप्ता इत्यादी.

या योजनेच्या अधिक माहितीकरिता संबंधित तालुका कृषी अधिकारी, उप विभागीय कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी किंवा संबंधित विमा कंपनीकडे संपर्क साधावा.

English Summary: weather based fruit crop insurance scheme for ambiya bahar
Published on: 10 October 2018, 01:58 IST