Others News

विवो कंपनीने अलीकडे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे स्मार्टफोन लॉंच केले असून अगदी परवडणाऱ्या किमतींमध्ये ग्राहकांना अतिशय चांगल्या सुविधा या फोनमध्ये देण्यात आलेले आहे. मागील काही महिन्यात अगोदर विवो कंपनीने 'विवो Y15s' हा फोन लाँच केला होता. या फोनमध्ये अतिशय कमी किमतीत ग्राहकांना वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच डिस्प्ले, डुएल रियर कॅमेरा देण्यात आले आहेत.

Updated on 26 September, 2022 4:44 PM IST

विवो कंपनीने अलीकडे खूप चांगल्या चांगल्या प्रकारचे स्‍मार्टफोन लॉंच केले असून अगदी परवडणाऱ्या किमतींमध्ये ग्राहकांना अतिशय चांगल्या सुविधा या फोनमध्ये देण्यात आलेले आहे. मागील काही महिन्यात अगोदर विवो कंपनीने 'विवो Y15s' हा फोन लाँच केला होता. या फोनमध्ये अतिशय कमी किमतीत ग्राहकांना वॉटर ड्रॉप स्टाईल नॉच डिस्प्ले, डुएल रियर कॅमेरा देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन गूगल अँड्रॉईड गो एडिशन या प्रणालीवर ऑपरेट होतो. तसेच या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची जबरदस्त दमदार बॅटरी दिली आहे.

नक्की वाचा:Mobile World: विवो कंपनीच्या 'या' चार स्मार्टफोनवर मिळत आहे जबरदस्त ऑफर,वाचा डिटेल्स

 या फोनची वैशिष्ट्ये

1- हा फोन डुएल डुएल नॅनो सिम सपोर्ट करत असून अँड्रॉइड 11 च्या फनटच OS11.1 या प्रणालीवर काम करतो.  या फोनमध्ये 6.51 इंच एचडी+(720×1600 पिक्सल) चा आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली असून 32 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. ग्राहक यामध्ये एसडी कार्ड देखील टाकू शकता.

2- उत्तम फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी यामध्ये डुएल रियर कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये तेरा मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे. तसेच दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा असून सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

नक्की वाचा:Mobile Update: शाओमीचा 'हा' फोन स्वस्तात घेण्याची संधी, वाचा या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत

3- तसेच कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये डुएल बॅड,  वाय-फाय तसेच ब्लूटुथ v5.0, GPS/A-GPS, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी पोर्ट देण्यात आले आहे.

या स्मार्टफोनमध्ये ग्राहकांना साइड फिंगरप्रिंट देखील मिळते.

 या फोनची किंमत

 यामध्ये आपल्याला तीन जीबी रॅम आणि बत्तीस जीबी स्टोरेज मिळणार असून याची किंमत कंपनीने 10 हजार 990 रुपये इतकी ठेवली आहे. हा फोन मिस्टिक ब्लू आणि वेव्ह ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

नक्की वाचा:Mobile News: वनप्लसचा 'हा' जबरदस्त स्मार्टफोन करू शकता 17 हजारपेक्षा कमी किमतीत खरेदी, कसा ते जाणून घ्या?

English Summary: vivo y15s smartphone is get in affordable price to customer
Published on: 26 September 2022, 04:44 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)