सध्या विवो कंपनी वाय सिरीजच्या माध्यमातून अनेक चांगले स्मार्टफोन सादर करीत असून सध्या कंपनीने एक नवीन मध्यम बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या लेखामध्ये आपण या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य आणि किंमत जाणून घेऊ.
'विवो Y73t 5G' फोनची वैशिष्ट्ये
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन 20:9 अस्पेक्ट रेशोवर सादर करण्यात आला असून 2408×1080 पिक्सल रेसोल्युशनसह 6.58 इंच फुल एचडी प्लस डिस्प्लेला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर तयार करण्यात आली असून ती 60Hz रिफ्रेशर रेटवर काम करते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर सादर करण्यात आला
असून यामध्ये 2.2GHz क्लॉक स्पीडसह ऑक्टाकोर प्रोसेसर सात नॅनोमीटर फॅब्रिकेशन वर तयार केलेला इंडियाटेक डायमेनसिटी 700 ट्रिपल सेट आहे. उत्तम फोटोग्राफीसाठी डुएल रियर कॅमेराला सपोर्ट करतो. मागील बाजूला 50 मेगापिक्सेलचा प्राथमिक सेन्सर एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.
तसेच2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनची किंमत
महत्त्वाचे म्हणजे हा फोन तीन प्रकारांमध्ये सादर करण्यात आला असून यामधील आठ जीबी रॅमसह बेस व्हेरिएंट मध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
त्याची किंमत सुमारे 15 हजार 900 रुपये आहे. तसेच8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज आणि तिसरे व्हेरिएंट म्हणजे बारा जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज यामध्ये असणार आहे. हा फोन ब्ल्यू, ऑटम आणि ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
नक्की वाचा:गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता एका वर्षात मिळतील 'इतके'सिलेंडर, वाचा डिटेल्स
Published on: 01 October 2022, 03:47 IST