Others News

सध्या बाजारपेठेमध्ये आपण पाहत आहोत की विविध कंपन्यांचे उत्तम वैशिष्ट्य असलेले स्मार्टफोन लॉन्च होत आहेत. जर आपण स्मार्टफोनच्या बाबतीत ग्राहकांचा विचार केला तर प्रत्येकाची इच्छा असते की बजेट किंमतमध्ये चांगले वैशिष्ट्य असलेला स्मार्टफोन मिळणे हे होय. अशाच ग्राहकांसाठी विवो कंपनीने दिवाळीच्या तोंडावर 'विवो V 25' 5 जी स्मार्टफोनचे दोन प्रकारांमध्ये लॉंचिंग केले आहे. हा फोन दोन वेगवेगळ्या रंगांच्या ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.

Updated on 17 September, 2022 2:29 PM IST

नक्की वाचा:Smartphone: मध्यम बजेटमध्ये अनेक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य मिळतील 'या'फोनमध्ये,वाचा या फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत

या फोनची दोन प्रकार किंमत

 यामध्ये दोन प्रकार असून यातील 8 जीबी रॅम असलेल्या स्मार्ट फोनची किंमत 27 हजार 999 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 31 हजार 999 रुपये असणार आहे.

 8 जीबी रॅम असलेल्या फोनची वैशिष्ट्ये

 आठ जीबी प्रकारांमध्ये 4500 mAh लिथियम आयन बॅटरी असून, मोबाईल सर्फिंग ब्लू आणि एलिगंट ब्लॅक या दोन रंगांमध्ये हा फोन मिळणार आहे. 64 मेगापिक्सल, 8 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा आणि 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यामध्ये देण्यात आला आहे. या फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज असून याची किंमत 27 हजार 999 रुपये आहे.

नक्की वाचा:Mobile News: विश्वास बसणार नाही अशा किमतीमध्ये 'Realme C33' स्मार्टफोन लॉन्च, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

 12 जीबी रॅम असलेल्या फोनची वैशिष्ट्ये

 या फोनमध्ये बारा जीबी रॅम असून 256 जीबी स्टोरेज आहे. या फोन मध्ये 50 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सह 64 मेगापिक्सल नाईट विजन, 8 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरे यामध्ये आहेत. यामध्ये 4500 mAh बॅटरी असलेला हा स्मार्टफोन 6.44 इंच फुल एचडी डिस्प्ले सोबत आहे.

या दोन्ही फोन सोबत यूएसबी पॉवर अडप्टर, युएसबी केबल, फोन कव्हर तसेच बॉक्समध्ये स्क्रीन गार्ड  इत्यादी  मिळणार आहे.

नक्की वाचा:Important: अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी सरकारची 'ही' विमा योजना आहे खूप फायद्याची, वाचा सविस्तर माहिती

English Summary: vivo launch vivo v 25 smartphone in two type with many features
Published on: 17 September 2022, 02:29 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)