Others News

आपल्या राज्यातील बरेच खेडी गावे विकासावीणा आहेत, त्यामध्ये कारणीभूत हे अनेक घटक असतात व अनेक पदावर कामे करणारी लोक असतात त्यामध्ये सरपंच असू शकतात ग्रामसेवकही आणि गावातील लोकही.

Updated on 16 May, 2022 9:45 AM IST

तर आज आपण जाणून घेणार आहोत ग्रामसेवकाचे नेमके गावासाठी काय कार्य असते व त्याच्या जबाबदाऱ्या काय ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी ग्रामसेवकाची नेमणूक केली जाते. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व कारभारावर त्याचे नियंत्रण असते, तो जिल्हा परिषदेचा सेवक असतो. त्याची नेमणुक मुख्ये कार्यकारी अधिकारी जि. प. करतात. त्याची बदली करण्याचा अधिकार जि.प. लाच आहे. काहीवेळा ग्रामसेवकाकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात येते.महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन १९६१, तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमन १९५८ ग्रामसेवकांची कामे व जबाबदाऱ्या शासनाने आखून दिलेली आहे. ग्रामसेवकाने या नियमावली प्रमाणे काम करणे बंधनकारक आहे. गावातील नागरिकांनी सर्व नियम काळजीपूर्वक अभ्यासावेत आणि खालील कामे व जबाबदा-या, विविध कल्याणकारी योजना ग्रामसेवक आखून दिलेल्या नियम व पद्धतीने पार पाडतो कि नाही याची पडताळणी करण्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वारंवार व भरपूर उपयोग करावा. ग्रामसेवक हा ग्रामस्तरीय कार्य करणारे व्हीडीओ / ग्रामसेवक जीपीचे सेक्रेटरी म्हणून काम करतात आणि जीपी स्तरावर खाती व नोंदी सांभाळण्यासही जबाबदार असतात.ग्रामसेवक हा सामान्य गावकरी आणि शासन यांच्यातील महत्वपूर्ण दुवा असून चुकीचे काम करणाऱ्या ग्रामसेवकांना चाप लावा व चांगले कार्य करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रोत्साहन द्या.

ग्रामसेवकाची कामे व जबाबदाऱ्या प्रशासन:1) ग्रामपंचायत कडील सर्व प्रकारचे अभिलेख जतन करणे, सरपंचाच्या मदतीने विकासाची कामे पार पाडणे.2) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायतीचे अभिलेखे वेळोवेळी आवश्यक त्या नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे.3) पंचायतीने ठरवून दिल्यानंतर ग्रामसभा, मासिक सभा बो‍लविणे, त्यांच्या नोटिसा काढून संबंधितांना देणे, *सभेचा कार्यवृतांत लिहिणे व सभेमध्ये झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी व पूर्तता करणे* , हे काम पंचायतीच्या सहकार्याने करावे.4) शासनाने व जिल्हा परषिदेने बसविलेले विविध कर (वसूल करण्‍याबाबतचे आदेश सचिवांकडून प्राप्त‍ झाल्यानंतर) व फी यांची वसूली करणे, प्रत्येकी चार वर्षांनी कराची आकारणी करुन २५ टक्के वाढ सुचविणे.5) ग्रामपंचायतीकडील लेखा परीक्षणांत केलेल्या, आक्षेपांना उत्तर देणे.6) ग्रामपंचायत हद्दीतील जमिन, रस्ते, इमारती, पडसर जागा, व इतर सार्वजनिक जागा यांच्या मोजमापाचे अभिलेख अद्यावत ठेवणे व ग्रामदर्शक नकाशा ग्रामपंचायतीमध्ये ठेवणे.7) जन्म, मृत्यु, उपजत मृत्यु, विवाह नोंदणी करणे.8) ग्रामपंचायत क्षेत्रातील पंचायत सभासदांच्या सहकार्याने ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी सोसायट्या, दुध डेअरी, नागरी पतसंस्था, स्था्निक महिला मंडळे, तरुण मंडळे, बालवाडी, आंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, स्वयंसेवी संस्था व इतर मान्य संस्था् यांच्याशी समन्वय साधून या सर्व लोकोपयोगी कार्यक्रम बनविण्या‍च्या दृष्टीने प्रयत्न करणे.

9) ग्रामपंचायत पातळीवर शासकीय, निमशासकीय, कर्मचा-यांना आठवडयातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे.10) सरपंच, उपसरपंच यांना सभेच्या वेळी व आवश्यकता असेल तर इतर वेळी कायदेविषयक सल्ला देऊन, आवश्यकता असल्यास आपले मत नोंदविणे.11) ग्रामपंचायत ही नियमांची व कायद्यांची उलंघन करणारी कृती करीत असेल किंवा तसे करावयाचे ठरविले असल्यास त्याबाबत अहवाल मुख्य कार्यकारी अधिकरी / गट विकास अधिकारी यांना विहीत मुदतीत सादर करणे.12) ग्रामपंचायतीचा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करुन प्रचायत समितीस विहीत मुदतीत सादर करणे.निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सुचना व आदेश यांचा काटेकोरपणे पालन करणे.13) ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील कर्मचा-यांवर नियंत्रण व त्यांची आस्थापना विषयक बाबी उदा. सेवापुस्तक, वैयक्तीक समस्या परिपूर्ण ठेवणे, भविष्य् निर्वाह निधी, बोनस इ. शासनाच्याा आदेशानुसार व नियमानुसार देणे.

नियेाजन:1) ग्रामपंचायतीचे सरपंच व सभासद यांचे सहकार्य घेऊन गावाचा विकास करण्याच्या दृष्टीने विकासाचे पंचवार्षिक नियोजन करणे. रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टी्ने उद्योग धंद्यात वाढ करणे. पडीक व लागवडी योग करण्याच्या दृष्टीने जमिनीचा विकास करुन व सिंचन क्षमता वाढवुन शेतजमिनीचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, रस्तें दुरुस्ती, डांबरीकरण सांडपाण्यासाठी गटारे,परिसर स्वच्छता, पशुधन विकास, वैरण विकास, बाल कल्याण योजना, साक्षरता मोहिम याबाबतीत शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व आदेश यानुसार कार्य करणे, जवाहर रोजगार योजनेंतर्गत ग्रामपंयाचतीचे उत्पन्न व इतर शासकिय व जिल्हा परिषदांकडून उपलब्ध होणारे व अपेक्षित असलेले अनुदान याचा विचार करुन ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक आराखडा तयार करणे.2) वार्षिक कृती आराखडा तयार करुन एप्रिल मध्ये होणा-या ग्रामसभेपुढे ठेवून ग्रामसभेची मान्यता घेणे.3) योजनांची अंमलबजावणी सुरळीत पणे होत असल्या बाबत लक्ष ठेवणे.शेतीवषियक1) शासनाकडून तसेच जिल्हा परिषदेकडून वेळोवेळी जाहीर होणा-या योजनांची माहिती प्राप्त करुन ती ग्रामसभा, मासिक सभा व इतर सार्वजनिक सभामार्फत ग्रामस्थांपर्यंत पोहचविणे व त्याबाबतची माहिती ग्रामस्थांना देणे, दारिद्रय रेषेखालील लोकांचे सर्वेक्षण करणे.2) ग्रामसभेपुढे कामाचे प्रस्ताव मान्यतासाठी ठेवणे.3) प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सदर प्रस्ताव खाते प्रमुख, तांत्रिक अधिकारी यांचेकडे मंजुरीसाठी पाठविणे, बांधकामावर देखरख ठेवणे, कामाची पाहणी करुन, मूल्यांकन प्रस्ताव तांत्रिक अधिकारी यांच्याकडे पाठविणे, महात्मा गांधी राष्ट्रीय योजनेंतर्गत जमा-खर्चाची माहिती ग्रामसेवक व सरपंच यांच्या संयुक्त सहिने ग्रामसभेपुढे ठेवणे.

कुटूंब कल्याण कार्यक्रम:1) कुटंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शासनाकडून वेळोवेळी नवीन आलेल्या योजनांची माहिती ग्रामस्थांना देणे.कल्याणकरी योजना 1) महिला व बालकल्याण, समाजकल्याण, साक्षरता प्रसार, अंधश्रध्दांनिर्मुलन कायदेवषियक सहाय्य व सल्ला देणे. इ. योजनांबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे.2) तसेच या योजनांची अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करणे.3) पशूसंवर्धनाबाबत विविध योजनांची माहिती देणे व या योजनेसाठी प्रेात्साहन देणे.शुध्द पाणी पुरवठा योजना सुस्थितीत ठेवणे, त्यांची दुरुस्ती व देखभाल करणे, शुध्दीकरणासाठी औषधांचा पुरेसा साठा करणे, पाणीवाटपाचे नियोजन, देखभाल व दुरुस्तीसाठी होणा-या खर्चा इतकी पाणीपट्टी बसविणे, त्या बाबतचा अहवाल पंचायतीला सादर करणे आणि त्या‍वर पंचायतीने केलेल्या आकारणीनुसार पाणीपट्टी आणि विशेष पाणीपट्टी वसुलीची कार्यवाही करणे. पूर, दुष्काळ, भूकंप, टोळधाड, टंचाई, साथरोग इत्यादी नैसर्गीक आपत्ती उदभवल्यास त्याबाबत त्वरीत संबधीत खात्याला कळविणे* व ग्रामपंचायतीने आरोग्यखात्याच्‍या सहाय्याने प्राथमिक उपाययोजना करणे. सदरची पोस्ट जनहितार्थ लोक जागृती साठी असून महाराष्टातील सर्व गावकरी यांच्यासाठी आहे

English Summary: Villagers pay attention, what are the duties and responsibilities of Gram Sevak? Understand this
Published on: 16 May 2022, 09:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)