Village Business Idea : जर तुम्ही गावात राहत असाल आणि तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय (Business Idea) करण्याचा विचार करत असाल, तर आजची ही बातमी विशेष तुमच्यासाठी. मित्रांनो आज आम्ही आपणास कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय (Business News) केला जाऊ शकतो या विषयी माहिती देणार आहोत.
आज आपण कमी वेळेत आणि कमी खर्चात विशेष म्हणजे गावात राहून सुरू कोणता व्यवसाय केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते छोटे व्यवसाय आहेत जे तुमचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढवण्यात मदत करू शकतात.
बांधकाम साहित्य पुरवठा व्यवसाय
मित्रांनो जर आपण गावात राहत असाल तर गावात राहून आपण बांधकाम साहित्याच्या पुरवठ्याचा व्यवसाय सुरु करू शकता. खरे तर गाव असो की शहर, सगळीकडे घरे बांधली जातात. अशा परिस्थितीत घरबांधणीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची गरज भासते, त्यामुळे तुम्ही गावात बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय करू शकता. विशेष म्हणजे या व्यवसायातून तुम्हाला चांगली कमाई देखील होऊ शकते.
धान्य खरेदी विक्री व्यवसाय
जर तुम्हाला छोटा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही धान्य विकण्याचा व्यवसाय करू शकता. सध्या शेतकऱ्यांना पिकांची विक्री करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी मध्यस्थांना कमी किमतीत पिके विकतात, त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही शेतकऱ्यांकडून अधिक प्रमाणात आणि स्वस्त दरात पिके खरेदी करून बाजारात विकून चांगला नफा मिळवू शकता.
आचार पापड व्यवसाय
लोक अनेकदा कामासाठी घरापासून दूर जातात, तिथे त्यांना अनेक गोष्टींबाबत तडजोड करावी लागते, पण जेव्हा जेवणाचा प्रश्न येतो तेव्हा आपण घरची तीच चव शोधू लागतो. अशा वेळी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जेवणात घरची चव देतात. यामध्ये लोणच्याचा देखील समावेश होतो. होय, जेवण कोणतेही असो, घरचे लोणचे त्यात दिसले तर जेवणाला चव येते.
बाजारात अनेक प्रकारची लोणची मिळतात, मात्र घरातल्या लोणच्याची बात काही औरच आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरबसल्या लोणच्याचा व्यवसायही करू शकता. अशा देशात लाखो महिला आहेत ज्या लोणचे-पापडच्या व्यवसायातून चांगला नफा कमावत आहेत. तुम्ही देखील या व्यवसायातून चांगली कमाई करू शकतात.
Published on: 30 October 2022, 03:44 IST