Others News

Village Business Idea: मित्रांनो कोरोना महामारी आल्या पासून अनेकांना नोकरी (Job) करण्याऐवजी व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हालाही तुमची नियमित नोकरी करण्याऐवजी काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही तुमचा छोटा गृहउद्योग उघडू शकता. तुम्ही शेतकरी (Farmer) असाल किंवा गावात राहत असाल तरी देखील तुम्ही हा व्यवसाय (Business) सुरु करू शकता. विशेष म्हणजे आपली शेतीची (Farming) कामे करून किंवा दुसरा इतर उद्योग धंदा करून देखील तुम्ही हा व्यवसाय (Business) करू शकता.

Updated on 18 August, 2022 9:30 PM IST

Village Business Idea: मित्रांनो कोरोना महामारी आल्या पासून अनेकांना नोकरी (Job) करण्याऐवजी व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हालाही तुमची नियमित नोकरी करण्याऐवजी काहीतरी वेगळे करायचे असेल तर तुम्ही तुमचा छोटा गृहउद्योग उघडू शकता.

तुम्ही शेतकरी (Farmer) असाल किंवा गावात राहत असाल तरी देखील तुम्ही हा व्यवसाय (Business) सुरु करू शकता. विशेष म्हणजे आपली शेतीची (Farming) कामे करून किंवा दुसरा इतर उद्योग धंदा करून देखील तुम्ही हा व्यवसाय (Business) करू शकता.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला पापड बनवण्याच्या व्यवसायाबद्दल (Papad making business) सांगणार आहोत. पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही दर महिन्याला चांगली कमाई करू शकता. पापड हा असाच एक खाद्यपदार्थ आहे जो भारतात लोकांना खायला आवडतो. या छोट्या व्यवसायाला तुम्ही मोठ्या पातळीवर नेऊ शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी या गोष्टींची आवश्यकता असेल बर…!

जर तुम्हाला पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला काही काम करणाऱ्या लोकांची गरज लागेल. यासोबतच तुम्हाला पापडानुसार कच्चा माल लागेल. यासोबतच पापड बनवण्यासाठी आणि पॅकिंगसाठी मशीन लागणार आहे. यासोबतच यंत्रे चालवण्यासाठी विजेचीही गरज भासणार आहे.

इतकी गुंतवणूक करावी लागेल बर…!

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये लागतील. या पैशातून तुम्हाला कच्चा माल, मशिन आणि इतर गरजेच्या वस्तू खरेदी कराव्या लागतील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार लोकांना खूप मदत करते.

मुद्रा लोन अंतर्गत तुम्ही बँकेकडून 4 लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. त्याच वेळी, तुम्हाला तुमचे स्वतःचे 1 लाख रुपये गुंतवावे लागतील. यानंतर तुम्ही या पापड युनिटद्वारे 30,000 किलो उत्पादन करून बाजारात विकता. तुम्ही कर्जाची रक्कम ५ वर्षांच्या आत परत करू शकता.

इतका नफा मिळेल बर…!

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 5 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यानंतर तुम्ही हे पापड स्थानिक बाजार, सुपर मार्केट इत्यादी सर्व ठिकाणी विकु शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ऑनलाइन माध्यमातूनही पापड विकू शकता. दर महिन्याला या व्यवसायातील खर्च वेगळे केल्यावर तुम्हाला 30 ते 40 हजार रुपयांचा परतावा मिळू शकतो.

English Summary: village business idea papad making business information
Published on: 18 August 2022, 09:30 IST