Others News

Village Business Idea : मित्रांनो व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. खरं पाहता अलीकडे अनेक सुशिक्षित युवक नोकरीऐवजी व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत आहेत. गावात राहणारे नवयुवक देखील आता व्यवसायात अधिक प्रमाणात उतरत असल्याचे चित्र आहे.

Updated on 26 September, 2022 10:38 PM IST

Village Business Idea : मित्रांनो व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी आजची ही बातमी खास राहणार आहे. खरं पाहता अलीकडे अनेक सुशिक्षित युवक नोकरीऐवजी व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहत आहेत. गावात राहणारे नवयुवक देखील आता व्यवसायात अधिक प्रमाणात उतरत असल्याचे चित्र आहे.

अनेक युवकांना हजारो रुपयांची नोकरी करण्यापेक्षा स्वतः मालक बनून व्यवसाय करायला आवडत आहे. मात्र असे असले तरी अनेक युवकांना व्यवसायाची योग्य ती माहिती नसल्याने व्यवसाय सुरू करण्यात अडचण येत असते तसेच अनेक युवक पुरेसे भांडवल नसल्याने व्यवसाय सुरू करू शकत नाहीत. आज आम्ही युवकांची हीच समस्या हेरून कमी भांडवलात सुरू करता येऊ शकणारे व्यवसायांची माहिती घेऊन आलो आहोत.

अशा परिस्थितीत जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे व्यवसाय सुरू करून आपण देखील लाखो रुपये कमवू शकता. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता चालू घेऊया या बिजनेस विषयी सविस्तर माहिती. जर आपण ग्रामीण भागात वास्तव्यास असाल तर आम्ही सांगितलेले व्यवसाय आपणासाठी फायदेशीर ठरू शकतात. आपण आपल्या गावात राहून देखील व्यवसाय सुरू करू शकता आणि चांगली कमाई देखील करू शकता.

गावात सुरू करता येणारे व्यवसाय (Village Business Idea)

सायबर कॅफे /ऑनलाइन काम :- जर आपण गावात राहत असाल तर सायबर कॅफे (Cybercafe) टाकून चांगली मोठी कमाई करू शकता. जर आपल्याकडे आवश्यक संगणक ज्ञान (Required computer knowledge) असेल तर आपण हा व्यवसाय यशस्वीरीत्या चालवू शकता. या व्यवसायाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या व्यवसायासाठी आपणास जास्त इन्व्हेस्टमेंट (Investment) करावी लागत नाही, या व्यवसायासाठी आपणास एका छोट्याशा ऑफिसची आवश्यकता असते यासाठी आपण आपल्या घराचा देखील वापर करू शकता किंवा आपण भाडेतत्वावर गावातील एखादी जागा घेऊ शकता आणि या व्यवसायाला सुरुवात करू शकता.

जागेव्यतिरिक्त या व्यवसायासाठी आपणास कॉम्प्युटरची (Computer) आवश्यकता भासेल, तसेच ज्या ठिकाणी आपण आपले ऑफिस सुरू करणार आहातत्या ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आवश्यक असणार आहे. एकंदरीत या व्यवसायासाठी एक कॉम्प्युटर, एक प्रिंटर, तसेच ऑफिस साठी इतर साहित्य लागणार आहे. हा व्यवसाय आपण एक लाखाच्या आत सुरू करू शकता. जर आपल्याकडे एवढी  रक्कम उपलब्ध नसेल तर आपण कॉम्प्युटर हे इंस्टॉलमेंट वरती देखील विकत घेऊ शकता. यामुळे आपणास कम्प्युटर साठी लागणारे संपूर्ण रक्कम एका वेळी भरावी लागणार नाही.

आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड :- मित्रांनो जर आपल्याकडे शेती (Farming) असेल तर आपण आपल्या शेतीत मेडिसिनल म्हणजेच आयुर्वेदिक वनस्पतींची (Medicinal Crops) लागवड करून चांगली मोठी कमाई (Farmer Income) करू शकता. आपल्याकडे शेती नसेल तरीदेखील आपण भाडेतत्त्वावर शेत जमिन घेऊन आयुर्वेदिक वनस्पतीची लागवड करू शकता. आयुर्वेदिक वनस्पतींना अलीकडे मोठी मागणी आहे त्यामुळे हा एक प्रॉफि्टेबल व्यवसाय सिद्ध होऊ शकतो. आपण तुळसी, गीलोय, लेमनग्रास, एलोवेरा, आवळा, यांसारख्या विविध औषधी वनस्पतींचे लागवड करून मोठे उत्पन्न कमवू शकता. यासाठी आपणास जास्त इन्वेस्टमेंटची गरज भासणार नाही, मात्र कुठल्याही वनस्पतीची लागवड करण्याआधी तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल.

English Summary: village business idea 2022 information marathi
Published on: 26 September 2022, 10:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)