Others News

भाजीपाला व फळे विक्री क्षेत्रात व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत. या व्यवसायातील बलस्थान किंवा जमिनीच्या बाजूचा विचार केला तर गुणवत्ता मालाची स्वच्छता आणि रसायनविरहित फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा या गोष्टी या व्यवसायात फार महत्त्वाच्या आहेत.

Updated on 12 March, 2022 10:33 AM IST

भाजीपाला व फळे विक्री क्षेत्रात व्यवसायाच्या उत्तम संधी आहेत. या व्यवसायातील बलस्थान किंवा जमिनीच्या बाजूचा विचार केला तर गुणवत्ता मालाची स्वच्छता आणि रसायनविरहित फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा या गोष्टी या व्यवसायात फार महत्त्वाच्या आहेत.

आपण पाहतो भाजीपाला विक्रेते शहरी भागात आपले भाजीपाला शॉप चांगल्या पद्धतीने सेट अप करून व्यवसायात चांगल्याप्रकारे प्रगती करत आहे. ग्राहकांचा ओढा या व्यावसायिकांकडे अधिक दिसतो. भाजीपाला ताजा केमिकल विरहित आणि स्वच्छ असेल तर ग्राहक भावात घासाघीस न करता आपला मालविकत घेतो.

  • हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी :

या व्यवसायाची सुरुवात करण्यापूर्वी भाजीपाला व फळे यांच्या मार्केट ची माहिती करून घ्यावी. सगळ्यात अगोदर म्हणजे भाजीपाल्याचे दर कोणत्या पद्धतीत कमी जास्त होतात व त्यावर आपला नफा कसा करावा लागेल याची माहिती करून घेणे फार महत्त्वाचे असते. स्थानिक शेतकरी आणि बाजारपेठेतून ठोक भावात भाजीपाला आणि फळे खरेदी करून किरकोळ मार्केटमध्ये त्याची विक्री करणे फायदेशीर असते. या व्यवसायात ग्राहक उत्तम असतो आणि ग्राहकांची कमतरता नसते. परंतु या व्यवसायात आपला स्वतःचा एखादा चांगला ब्रँड तयार करणे फार फायदेशीर ठरू शकते. भाजीपाल्यासाठी चांगला ब्रँड बनवून विक्री केल्यास चांगले मार्केट मिळेल तसेच मार्केटिंगवर भर द्यावा.आपण राहतो त्या जवळच्या परिसरात होम डिलिव्हरी दिल्या शॉप सेटप ची गरज पडणार नाही तसेच कालांतराने जाहिरात झाल्यास संपूर्ण शहरभर होम डिलिव्हरी सुरु करता येईल रिक्षा किंवा शिवाय कदम मालवाहू टेम्पो द्वारे चौकाचौकात किंवा स्टॅन्ड बनवून फिरत्या गाडीवर विक्री करू शकता. दररोज एखाद्या चांगल्या परिसरातील मार्केटमध्ये काही तास थांबलात तरी चांगला धंदा होतो.

  • या व्यवसायातील गुंतवणूक :

आपल्याला माहीतच आहे की हा व्यवसाय खूप कमीत कमी गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो. अगदी तुमच्याकडे पाच ते दहा हजार रुपये असतील तर हा व्यवसाय सुरू करता येईल तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे ब्रॅण्डिंग करायचे असेल तर त्यासाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे या व्यवसायातील बारकावे जर तुम्ही शिकलात तर या व्यवसायात चांगली प्रगती करू शकतात.

  • या व्यवसायातील प्रमुख वैशिष्ट्ये :
    • हा व्यवसाय तुम्हाला जुना वाटेल परंतु यामध्ये देखील तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता
    • फळे व भाजीपाला विक्री हा व्यवसाय तुम्ही जेवढे जास्त कष्ट कराल तेवढे जास्त उत्पन्न तुम्हाला मिळवून देईल.
    • सुरुवातीच्या काळात तुम्हाला या व्यवसायामध्ये जास्त पैसे गुंतवण्याची देखील आवश्यकता असते.
    • तुम्ही हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्या गावातील किंवा जवळच्या गावातील  शेतकऱ्यांकडून कांदा, बटाटा, वांगी, म्हणजे
  • बऱ्याच प्रकारचा भाजीपाला आणि शेतकऱ्यांकडून फळे विकत घेऊ शकता तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणच्या मार्केट कमिटी मधून तुम्ही भाजीपाला व फळे लिलावातून विकत घेऊ शकता
  • हा घेतलेला मालव्यवस्थित विलगीकरण करून तुम्ही डायरेक्ट जिल्ह्याच्या मार्केटला देखील पाठवू शकता. किंवा एक गाडी घेऊन तर त्या स्वरूपात मोठ्या गावांच्या आठवडे बाजारात देखील विकू  शकतात.
English Summary: vegetable and fruit selling bussiness is very profitable bussiness in less investment
Published on: 12 March 2022, 10:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)