Others News

महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक केल्याची नोंद सातबारावर करण्यासाठी ई पीक पाहणी एप 15 ऑगस्ट ला लॉन्च केले. या ॲप वर आतापर्यंत राज्यातल्या 77 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे.

Updated on 11 October, 2021 12:45 PM IST

 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक केल्याची नोंद सातबारावर करण्यासाठी ई पीक पाहणी एप 15 ऑगस्ट ला लॉन्च केले. या ॲप वर आतापर्यंत राज्यातल्या 77 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती आहे.

परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करत असताना बरेच समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची इ पीक पाहणी नोंदणी अजून बाकी आहे. या लेखामध्ये आपण इ पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी च्या सोप्या पायऱ्या विषयी जाणून घेणार आहोत.

 ई पीक पाहणी अँप वर नोंदणीसाठी च्या पायऱ्या

  • स्टेप 1- सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गूगल प्ले स्टोअर वर जा ई पीक पाहणी हे ॲप डाउनलोड करायचे आहे. हे ॲप डाऊनलोड करून नोंदणी करावी. पिक पेरणी ची माहिती सदरामध्ये तुमच्या जमीनीचा भूमापन क्रमांक / गट क्रमांक निवडावा.
  • स्टेप 2-जेव्हा तुम्ही तुमचा गट क्रमांक निवडला त्यावेळी तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्र किती आहे व पोटखराब क्षेत्र बद्दल सर्व माहिती दर्शवली जाईल. नंतर हंगाम निवडायचा आहे. हंगामामध्ये खरीप किंवा संपूर्ण वर्षापैकी हंगाम निवडू शकतात. पीक पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दर्शवली जाईल.
  • स्टेप 3- पिकांच्या वर्गामध्ये एक पिक पद्धती, मिश्र पीक, पॉली हाउस, शेडनेट हाऊस, पिक,पडीत क्षेत्र यापैकी योग्य पर्याय निवडावा. जमीन मिळकतीमध्ये निर्भेळ पिकांची नोंद करण्यापूर्वी जमिनीत कायम पड क्षेत्र असल्यास, प्रथम काय पड जमिनीची नोंदणी करावी. लोकांचा वर्ग निर्भेळ पीक निवड केल्यानंतर निर्वेड पिकाचा प्रकार, फळ व फळपीक पर्याय दिसतील. यापैकी योग्य पर्याय निवडावा.
  • स्टेप 4- एक पर्याय निवडून शेतातील पिकाचे नाव निवडून क्षेत्राची नोंदणी करावी. फळपीक पर्याय निवडल्यास फळझाडांची संख्या नक्षत्र नमूद करावे. मिश्र पीक निवडल्यानंतर पिके आणि क्षेत्र नमूद करावे.
  • मिश्र पिकाचे क्षेत्र नमूद करताना त्यातील घटक पिकांनी व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणात विभागून टाकावी. त्यातील घटक पिकांच्या क्षेत्राची बेरीज एकूण क्षेत्रा पेक्षा जास्त होऊ नये.
  • स्टेप 5- चालू हंगामामध्ये जमीन  पिकाखाली येत नसल्यास किंवा लागवड केली नसल्यास अशावेळी चालू पडक्षेत्र निवड करावी. जल सिंचनाचे साधन पर्याय खाली पिकांना पाणी देण्यासाठी ज्या सिंचन साधनांचा उपयोग करत आहात तो पर्याय निवडावा. त्यानंतर सिंचन पद्धत निवडायचे आहे. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन किंवा अन्य प्रकारे यापैकी एक पर्याय निवडणे अपेक्षित आहे. शेतकरी या ठिकाणी पिकप पेरणी केलेला/ लागवड केलेला पिकाचा दिनांक नमूद करतील. ( स्त्रोत- हॅलो कृषी)
English Summary: use this easy step do register your e pik pahaani
Published on: 11 October 2021, 12:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)