केंद्र सरकार द्वारा संपूर्ण देशामध्ये जे मोफत धान्य रेशन दुकानामार्फत दिले जात आहे. त्याचा लाभ मिळवण्यासाठी आणि स्वतःची ओळख ऍड्रेस प्रूफसाठी रेशन कार्डची गरज लागते. परंतु बऱ्याचदा लोक रेशन कार्डला इतक्या गंभीरतेने घेत नाही. त्यामुळे सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सेवा तुम्हाला मिळत नाहीत. रेशन कार्ड हे महत्वाचे कागदपत्रपैकी एक कागदपत्र आहे, त्याच्यातच आपल्या रेशन कार्डवर जर जुना मोबाईल नंबर असेल किंवा तो नंबर बंद झाला असेल तर नवीन मोबाईल नंबर लवकरात लवकर रेशन कार्डसोबत अपडेट करणे फार महत्वाचा आहे.
रेशन कार्डवरचा मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?
यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी अधिकृत संकेतस्थळाच्या पेजवर जावे लागते. ते संकेतस्थळ पुढीलप्रमाणे आहे. https://nfs. Delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे आपल्याला अपडेट युवर रजिस्टर मोबाईल नंबर हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करून आपल्याला काही माहिती विचारली जाते. जसे की, पहिल्या कॉलममध्ये घराच्या कुटुंबप्रमुखाचा आधार नंबर द्यावा लागतो. तसेच तिसरा कॉलमध्ये कुटुंब प्रमुखाचे नाव लिहावे लागते. शेवटच्या कॉलममध्ये आपला नवीन मोबाईल नंबर द्यावा लागतो. त्यानंतर आपला मोबाईल नंबर अपडेट होऊन जातो. महत्त्वाचे म्हणजे रेशन कार्डला आधार कार्ड हे लिंक करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती आता ते वाढवून दिली आहे. कोरोना महामारीच्या काळामध्ये वन रेशन वन नेशन ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला भारताच्या कुठल्याही कोपऱ्यात रेशन कार्ड असल्यावर मोफत धान्य मिळू शकते.
हेही वाचा : सर्वसामान्यांना दिलासा; आता येणार ग्रीन रेशन कार्ड , जाणून घ्या ! काय आहेत फायदे
कसे बनवाल आपले रेशन कार्ड
जर आपल्याला रेशन कार्ड बनवायचे असेल आपण राज्य सरकराच्या पोर्टलवर जाऊन तेथे रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. जर आपल्याला नवे रेशन कार्ड हवे असेल तर mahafood.gov.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. या संकेतस्थळावरुन आपण आपली तक्रारही दाखल करु शकता.
हेही वाचा : लग्नानंतर पत्नीचं नाव रेशन कार्डवर दाखल करायचंय ? मग करा 'या' गोष्टी
आवश्यक कागदपत्रे
- तलाठी रहिवासी दाखला व उत्पन्नाचा दाखला
- लाइट बिल, घरफाळा पावती
- घरमालकाचे संमतीपत्र
- १० रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प
- प्रतिज्ञापत्र (अॅफिडेव्हीट)
- धान्य दुकानदाराचे पत्र
- आधार कार्ड झेरॉक्स
- बँक पासबुक झेरॉक्स व महिलेचे दोन फोटो
नवीन रेशनकार्ड कोणाला मिळते आणि कागदपत्रे -
जर आपल्याला ई- महासेवा केंद्रातूनही आपण रेशन कार्डसाठी अर्ज करु शकता. यासाठी आपण https://www.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करा.
बाहेरगावाहून आलेले असल्यास : बाहेरगावाहून आलेले असल्यास त्याठिकाणच्या संबंक्षित सक्षम अधिकाऱ्याचा (तहसिलदार) स्थलांतराचा दाखला, रेशनकार्ड मूळप्रत.
ज्यांचे रेशनकार्ड कोठेच नाही : रेशनकार्डमध्ये कोठेच नाव नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र, तलाठ्याचा रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, लाइटबिल, भाडेकरू असल्यास घरमालकाचे संमतीपत्र, आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक व ज्या महिलेच्या नावाने कार्ड काढावयाचे आहे त्यांचे दोन फोटो. विभक्त कुटुंब असेल तर : वरील कागदपत्रांशिवाय विभक्त राहत असल्याचा सरकारी पुरावा उदा. लाइटबिल, घरफळा पावती, ग्रामपंचायत असेसमेंट उतारा यापैकी एक पुरावा. विभक्त राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र वडिलांनी किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तीने लिहून दिलेले असावे.
Published on: 30 October 2020, 03:10 IST