Others News

आधार कार्ड हे ओळखपत्राशिवाय सरकारी कामांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधारकार्डाशिवाय कोणतेच शासकीय कामे पुर्ण होत नाहीत. आपल्याविषयीची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांना या कार्डाद्वारे मिळत असते.

Updated on 13 August, 2020 6:47 PM IST


आधार कार्ड  हे ओळखपत्राशिवाय सरकारी कामांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधारकार्डाशिवाय कोणतेच शासकीय कामे पुर्ण होत नाहीत. आपल्याविषयीची सर्व माहिती संबंधित अधिकाऱ्यांना या कार्डाद्वारे मिळत असते.  पण यात सर्वात मोठी अडचण असते म्हणजे आपल्या आधार कार्डावरील पत्ता, आणि मोबाईल नंबर नेहमी बदल करण्याची. कारण आपण आपले राहते घर बदलले तर आपल्याला नवीन पत्ता अपडेट करावा लागतो. पण जर आपल्याकडे रहिवासा दाखला नसल्याने आपण आधारकार्ड अपडेट करु शकत नाहीत. अशावेळी आपण काय करावे असा प्रश्न आपल्याला पडतो.

पण नागरिकांनो घाबरण्याची गरज नाही आपण ऑनलाईन पद्धतीने आधार कार्डवर आपला पत्ता अपडेट करू शकतात. यासाठी आपल्याला व्हेरिफायरची गरज असते. हा व्हेरिफायर आपल्या परिवारातील कोणताही सदस्य असून शकतो किंवा आपला मित्र असून शकतो.  पण यासाठी आपल्याला ऑनलाईन  पत्ता व्हॅलिडेशन लेटरसाठी अर्ज करावा लागतो.

 कागदपत्राशिवाय आधारकार्डात पत्ता अपडेट करण्याची पद्धत .

  • UIDAI च्या अधिकृत सकेतस्थळावर जाऊन uidai.gov.in लॉगिन करा.
  • त्यानंतर ‘My Aadhaar’ टॅबमध्ये 'Update Your Aadhaar' चे एक पर्यात दिसेल.
  • यात आपल्याला  ‘Request for Address Validation Letter’ चा पर्याय मिळेल.
  • आता आपल्या समोर एक नवे पेज ओपन होईल.
  • येथे आपल्याला १२ अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल. किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडीसह कॅप्चा कोड टाकावा लागेल त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करावे लागेल.
  • आता आपल्या नोंदणी झालेल्या मोबाईल नंबरवर पाठवलेल्या सहा अंकाचा ओटीपी किंवा आठ अंकाचा टीओटीपी टाका. त्यानंतर लॉगिन करा.
  • त्यानंतर आपल्या व्हेरिफायर म्हणजे आपल्या पत्ताची पुष्ची करणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती द्या.
  • या अंतर्गत आपल्याला पत्ताची पुष्टी करण्याची व्यक्तीचा आधार कार्डनंबर टाकावा लागेल.
  • व्हेरिफायरला UIDAI सह नोंदणी झालेल्या मोबाईल नंबरवर SMS च्या माध्यमातून एक लिंक मिळेल.
  • या लिंकवर व्हेरिफायरने क्लिक केल्यानंतरत त्यांना एक ओटीपी मिळेल. 
  • आता नोंदणी झालेला मोबाईल नंबर आलेला ओटीपी आणि कॅप्चा कोडची नोंदणी करा.
  • व्हिरिफिकेशननंतर आपल्याला SMS च्या माध्यमातून सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर मिळेल.
  • आता  एसआरएन सह लॉग इन करा. डिक्लेयेरेशनवरवर क्लिक करा. आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
  • आता स्थानिक भाषेत आपला पत्ता एडिट करा.  आणि  सेव्ह बटनवर क्लिक करा.
  • यानंतर डिक्लेयेरेशनवर क्लिक करा आणि सबमिट बटन दाबा.

आता व्हेरिफायरटच्या पत्तावर पोस्टाच्या माध्यमातून एड्रेस व्हॅलिडेशन लेटर मिळेल. या पत्रात आपल्याला एक सीक्रेट कोड मिळेल. त्यानंतर UIDAI च्या Online Address Update पोर्टल वर लॉग इन करा.  सीक्रेट कोडच्या मदतीने एड्रेस अपडेट करा. यासह  नव्या पत्ताला रिव्ह्यू करा त्यानंतर शेवटची रिक्वेस्ट टाका.  त्यानंतर  आपल्याला अर्जाच्या स्थितीचा माहिती होण्यासाठी एक URN मिळेल.

English Summary: Update your address in Aadhaar Card without any documents
Published on: 13 August 2020, 06:47 IST