Others News

इंदापूरमधील आंबेडकर नगर येथील ८२ वर्षीय आजी सरस्वती भीमराव सोनवणे यांनी आपल्या आई वडिलांची एक जुनी आठवण जपून ठेवण्यासाठी आपल्या शेतीमधील काढणीला आलेले ज्वारीचे सव्वा दोन एकर पीक पक्षांना खाण्यासाठी तसेच शेतात ठेवले आहे. या सव्वा दोन एकर क्षेत्रातील ज्वारी पिकावर हजारो पक्षी आपली भूक भागवत आहेत. आजींनी अशा प्रकारे पक्षांसाठी धान्य राखून ठेवले असल्यामुळे त्या परिसरात पक्षांची रेलचाल चांगलीच वाढली आहे जे की आजीचं पक्षांसाठी असणारे प्रेम आपल्याला यामधून दिसत आहे. पूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये हा चर्चेचा विषय ठरलेला आहे जे की सगळीकडे सरस्वती आजीचं गुणगान गायले जात आहे.

Updated on 17 February, 2022 6:30 PM IST

१६ वर्षांपासून आजी पक्षांना खाऊ घालतायत :-

मागील १६ वर्षांपासून सरस्वती भीमराव सोनवणे या ८२ वर्षीय वयाने असलेल्या आजी आपल्या आई वडिलांच्या प्रेमापोटी शेतामध्ये असणारी जी उभी पिके असतील ती पक्षांना राखून ठेवत आहेत. एवढेच नाहीतर तर सरस्वती आजींनी शेतात येणाऱ्या पक्षांना पाण्याची सुद्धा सोय करून ठेवलेली आहे. पक्षांसाठी आजींनी विकतचे पाणी घेऊन ते प्लास्टिक च्या बाटल्यांमध्ये तसेच मडक्यात ठेवून पक्षाना पाण्याची सोय केलेली आहे. थोडक्यात पाहायला गेले तर आजींनी पशु पक्षांना आपले मित्रच केले आहे जे की त्यांची अगदी मनापासून सेवा करत आहेत. या ८२ वर्षीय आजींनी सेवा बघून अनेक पक्षीप्रेमी आजीच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस तसेच भेट घेत आहेत. तर पशुवैद्यकीय विभाग आजींचे कौतुक करत आहे.

रब्बी हंगामात परदेशातून येतायत पक्षी :-

रब्बी हंगामामध्ये परदेशात अनेक प्रकारचे पक्षी आपल्या देशाकडे त्यांचे थवे न थवे घेऊन येत असतात जे की सर्वात जास्त महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या भागात पक्षी आपले वास्तव्य निर्माण करतात. विविध भागात वसलेले पक्षी आपली भूक भागवण्यासाठी अनेक ठिकाणी शेतावणातून भटकत असतात जे की अनेक समस्यांचा पक्षांना तसेच शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. काढणीस आलेल्या पिकावर पक्षी बसतात त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होते. मात्र सरस्वती आजी यासाठी अपवाद ठरलेल्या आहेत जे की मागील १६ वर्षांपासून आजी पक्षांची मनापासून सर्व करत आहेत.

आजींच्या मुलांची सुद्धा साथ :-

आजींनी यावर्षी पक्षांसाठी सुमारे सव्वा दोन एकर ज्वारी पिकाचे क्षेत्र राखीव ठेवलेले आहे जे की या उपक्रमासाठी आजीच्या मुलांची सुद्धा चांगली साथ मिळत आहे. जर पाण्याची कमतरता भासली तर विकतचे पाणी घेऊन आजी पीक जोपासत असतात तसेच मुले सुद्धा सांगतात की आमची आई जे करत आहे त्यास आमचा हातभार आहे जे की आईला आम्ही सुद्धा यामध्ये मदत करत आहे. आजी दररोज सकाळी भाकरी भाजी घेऊन शेतात जात असतात आणि दिवसभर पक्षांसोबत आपला वेळ घालवत असतात जे की त्यांना यामधून आनंद भेटत आहे आणि त्यांच्या आई वडिलांची आठवण म्हणून सुद्धा त्यांना बरे वाटत आहे.

English Summary: Unique story of grandmother from Indapur taluka, serving the parties for the last 16 years
Published on: 17 February 2022, 06:22 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)