बोलता बोलता एखादी कल्पना डोक्यात यावी, आणि न सांगताच ती अगदी तशीच्या तशी समोरच्याला एकदम सुचावी.कधी नुसताचं एखाद्या गोष्टीचा सतत विचार करावा आणि कालांतराने अशक्य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात यावी, मग राहुन राहुन त्याबद्दल आश्चर्य वाटतं.असं का होतं माहितीय.आपलं डोकं एका रेडिओ सारखं आहे, ते नेहमी संदेशांचं आणि सिग्नलचं आदानप्रदान करत असतं, म्हणुन कधी आपलं मन एकदम आनंदी, प्रफुल्ल्लीत असतं, तरी कधी चिडचिड व्हायला लागते, आणि आपण उदास होतो. जर तुम्हाला नेहमीच आनंदी राहावं असं वाटत असेल तर हे वाचाच.
मनाचे दोन भाग आहेत, चेतन मन (जागं असलेलं मन) आणि अवचेतन मन (सुप्त मन). तसचं प्रत्येक मानवी मनाच्या चार अवस्था, म्हणजे चार फ्रिक्वेन्सी आहेत.बीटा अवस्था – हे आहे आपले चेतन मन, म्हणजे आपली म्हणजे सकाळी उठल्यापासुन रात्री झोपण्यापर्यंत ची जागृत अवस्था. ह्याची फ्रिक्वेन्सी आहे – १४ ते ३० हर्ट्झ.अल्फा स्टेट – ह्यात चेतन मन आणि अवचेतन मन दोघेही झोपलेले असतात. ह्याला ध्यान अवस्था किंवा मेडिटेशन स्टेट असेही म्हणतात. फ्रिक्वेन्सी – ७ ते १३ हर्ट्झ थीटा अवस्था – आपली झोपेची स्थिती, चेतन मन झोपलेले, अवचेतन मनाचे खेळ सुरुच.फ्रिक्वेन्सी – ३.५ ते ७ हर्ट्झ डेल्टा अवस्था – गाढ निद्रेची स्थिती. फ्रिक्वेन्सी – ०.५ ते ३.५ हर्ट्झ फक्त माणुसच नाही तर ह्या ब्रम्हांडातील प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी सोडत्येत.
आपल्या आजुबाजुला वातावरणाचा एक थर आहे, त्याला म्हणतात आयनमंडल. विचारांचे आदानप्रदान करणारं हे माध्यम आहे. याची फ्रिक्वेन्सी आहे ६.८ हर्ट्झ.आता वरच्या सर्व फ्रिक्वेन्सीचे आकडे पडताळुन पहा. वातावरणाची आणि मनाच्या अल्फा स्टेटची फ्रिक्वेन्सी एकच आहे.म्हणजे जर आपण आपल्या मनाला अल्फा स्टेटला नेलं, तर वातावरणच्या माध्यमाचा वापर करुन आपण आपल्याला हवं ते घडवु शकतो.अल्फा स्टेट म्हणजेच ध्यानाची अवस्थ.प्रत्येकानं जितकं आपलं वय आहे तितकी मिनीटे रोज ध्यान करायलाचं हवं, काही क्षणासाठी तरी सर्व विचार दुर सारुन स्वतः मध्ये डुंबुन जायला हवं. मन चंचल आहे, पण रोजच्या सरावाने ते हळुहळु शांत-शांत व्हायला लागतं. मग एका वेगळ्याच आनंदाची अनुभुती यायला लागते. ध्यान संपवताना ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर लक्ष्य केंद्रित करायचं, म्हणजे त्या आपल्याला ऑलरेडी मिळालेल्या आहेत असं फिल करायचं.
Published on: 25 May 2022, 11:36 IST