Others News

गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील तब्बल २१ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आले आहे. यामुळे हे कशामुळे केले गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत देशभरात बनावट अशी 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहेत.

Updated on 28 July, 2022 6:32 PM IST

सध्या राज्यसभेत भाजप खासदार सुशील कुमार मोदी यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे. याला उत्तर देताना ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी मोठी माहिती दिली आहे. यामुळे तुम्ही जर शिधापत्रिकाधारक (Ration Card) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) यांनी प्रश्न विचारल्यानंतर मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. यात महाराष्ट्रातील तब्बल २१ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आले आहे. यामुळे हे कशामुळे केले गेले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत देशभरात बनावट अशी 2 कोटी 41 लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहेत.

याबाबत पडताळणी केली गेली आहे. वेगवेगळ्या राज्यात ही आकडेवारी वेगवेगळी आहे. बिहारमध्ये सात लाख १० हजार शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. तसेच उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १.४२ कोटी शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात २१.०३ लाख शिधापत्रिका रद्द करण्यात आल्या आहेत.

सगळं काही ओक्के!! गटारीसाठी तब्बल 2500 बोकड, 700 टन चिकन, 50 टन मासे आणि सोबत दारुही..

दरम्यान, यूपीमध्ये कार्ड धारकांनी त्यांचे कार्ड सरेंडर केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. अपात्र शिधापत्रिकाधारकांना तहसीलमध्ये जाऊन रेशनकार्ड सरेंडर करावे लागत असल्याचा दावा या बातमीत करण्यात येत होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सर्वात सुरक्षित मर्सिडीज बेंझ कार मिळणार, मिसाईल हल्लाही फसणार, वाचा खासियत..

मात्र योगी सरकारने असा कोणताही नियम केला नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या काही वर्षात बनावट रेशनकार्ड धारकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली होती. यामुळे सध्या पडताळणी केली जात आहे. यामुळे संबंधीत कार्ड रद्द केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! आता 17 व्या वर्षी बनवा मतदान ओळखपत्र, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..
ब्रेकिंग! सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का, 'या' जागांवर होणार ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका
श्रीलंकेनंतर आता इराक, आंदोलकांचा संसदेवर ताबा, देशातील परिस्थिती हाताबाहेर..

English Summary: two crore ration cards cancelled, Modi government's big decision..
Published on: 28 July 2022, 06:32 IST