Others News

सध्याच्या महागाई वाढीमुळे अनेकांनी बँकांमधील फिक्स डिपॉझिट काढून घेतले आहेत. गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिट परवडत नाही. अशातच ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी बँकांनी दिली आहे.

Updated on 28 September, 2022 11:34 AM IST

सध्याच्या महागाई वाढीमुळे अनेकांनी बँकांमधील फिक्स डिपॉझिट (Fixed Deposit) काढून घेतले आहेत. गुंतवणूकदारांना फिक्स डिपॉझिट परवडत नाही. अशातच ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी बँकांनी दिली आहे.

देशातील दोन मोठ्या बँकांनी फिक्स डिपॉझिटच्या (Fixed Deposit) व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेऊन वाढ करण्यात देखील आली आहे. आयडीएफसी आणि बंधन बँकेने फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली आहे.

आयडीएफसी बँकेने २ कोटीपासून २५ कोटीपर्यंत एफडीवर व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासारखा बंधन बँकेनेही २ कोटी आणि यापेक्षा जास्त एफडीवर जास्त व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. बँका आता एफडीवर ७.८० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. व्याजाचे स्वरूप कसे असणार? याविषयी जाणून घेऊया...

नॅनो-फर्टिलायझर लिक्विड शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा वाचवणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये

आयडीएफसी (IDFC) फस्ट बँक ३६६ दिवसांपासून ते ७३१ दिवस कालावधीपर्यंत २ कोटी पासून ते २५ कोटीपर्यंतच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देणार आहे. यासारखे ७३२ दिवस ते १० वर्षापर्यंत पूर्ण होणाऱ्या एफडीवर बँक ७ टक्क्यांचे वर्षिक दराने व्याज देणार आहे.

बँकेने २७१ दिवसापासून ३६५ दिवसापर्यंत पूर्ण करणाऱ्या एफडीवर ६.८५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. जी १८१ दिवसापासून २७० दिवसात पूर्ण होणाऱ्या एफडीवर आता ग्राहकांना ६.४५ टक्के व्याज मिळणार आहे.

सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत नवीन तीन नियम लागू; गुंतवणूक करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती..

बंधन बँकेनेही व्याजदरात केली वाढ

बंधन बँकेने (bandhan bank) २ कोटीपासून ते ५० कोटीपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३६५ दिवस ते १५ महिने ५ वर्षापेक्षा कमी असणारी एफडीवर व्याजदर ७.२५ टक्के देण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाचे म्हणजे हे नवीन दर 26 सप्टेंबरपासून लागू झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो 'या' तारखेपासून भुईमुगाची पेरणी करा; मिळेल भरघोस उत्पादन
Tur Market Price: 'या' बाजार समितीत तुरीला मिळतोय सर्वाधिक भाव; जाणून घ्या दर
मिथुन आणि तूळ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार आनंदाचा काळ; वाचा आजचे राशीभविष्य

English Summary: two bank increase interest rates FD Investors get benefits
Published on: 28 September 2022, 11:31 IST