Others News

सध्या देशात स्कूटरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे, देशात पेट्रोलचे दाम दिवसेंदिवस आकाशाला गवसणी घालत आहेत त्यामुळे देशात इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric Vehicles) बाजार वाढला आहे, मात्र असे असले तरी अनेकांना इलेक्ट्रिक वाहन ऐवजी पेट्रोल वाहन (petrol vehicle) चालवण्यास पसंत असते, म्हणूनच की काय अजूनही देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल स्कूटर (Petrol scooter) मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. देशात पेट्रोल स्कूटरची एक्स शोरूम किंमत पन्नास हजार रुपयांपासून सुरू होते. आज आपण कमी किमतीत दमदार मायलेज देण्यासाठी विशेष ओळखली जाणारी टीव्हीएस कंपनीच्या एका स्कूटर विषयी जाणून घेणार आहोत, हो आज आपण टीव्हीएस ज्युपिटर विषयी जाणून घेणार आहोत.

Updated on 02 March, 2022 2:18 PM IST

ही स्कूटर भारतीय ऑटोमोबाईल सेक्टर मध्ये मोठी चर्चेतं असते, तसेच दमदार मायलेज (Mileage) मुळे व स्टायलिश लूक मुळे ही स्कूटर मध्यमवर्गीय लोकांची पहिली पसंत (First choice of middle class people) आहे. या स्कूटरची एक्स शोरूम किंमत 67 हजार पासून सुरू होते तर 78 हजार रुपयांपर्यंत असते. मित्रांनो जर आपणास टीव्हीएस ची टीव्हीएस ज्युपिटर ही स्कूटर खरेदी करायची असेल मात्र एवढी मोठी रक्कम आपल्याकडे उपलब्ध नसेल, तर चिंता करू नका आज आम्ही खास आपल्यासाठी एक ऑफर घेऊन आलो आहोत. या ऑफर द्वारे आपण अगदी कमी किमतीत टीव्हीएस ज्युपिटर आपल्या घरी घेऊन जाऊ शकता. टीव्हीएस ज्युपिटर या स्कूटरवर असलेल्या ऑफरविषयी जाणून घेण्याअगोदर आपण या स्कूटरची विशेषतः जाणून घेऊया.

Tvs Jupiter Specialization

टीव्हीएस कंपनीने या स्कूटरमध्ये 109.7 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन प्रोव्हाइड केले आहे. हे एंजन 7.88 पीएस पावर जनरेट करण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे तसेच हे इंजिन 8.8 एनएम टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या स्कूटरला इतर स्कूटर प्रमाणेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले गेले आहे. कंपनीने या स्कूटरमध्ये ब्रेकिंग सिस्टम स्ट्रॉंग केली आहे, या स्कूटरला कंपनीने फ्रंट आणि रियर दोन्ही मध्ये ड्रम ब्रेक प्रोव्हाईड केले आहेत.

या स्कूटरला ट्यूबलेस टायर देण्यात आले आहेत तसेच कंपनीने एलोय व्हील देखील प्रोव्हाइड केले आहेत. ही स्कूटर 64 किलोमीटर प्रति लिटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम असल्याचा कंपनीचा दावा आहे.

आता जाणुन घेऊया ऑफरविषयी

»TVS कंपनीची ज्युपिटर ही स्कूटर DROOM या वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवली गेली आहे, मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, ही वेबसाईट सेकंड हॅन्ड स्कूटर बाईक विक्रीसाठी व खरेदीसाठी ओळखली जाते. या साइटवर 2016 वर्षाचे TVS Jupiter हे मॉडेल विक्रीसाठी पोस्ट केले गेले आहे, ज्याची किंमत 22,000 रुपये आहे आणि विशेष म्हणजे यावर फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

»CREDR ही देखील अशीच एक साईट आहे यावर TVS ज्युपिटरचे 2014 या वर्षाचे मॉडेल 19,950 रुपयांना विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. मित्रांनो मात्र या ठिकाणी कोणतीही वित्त ऑफर कंपनीद्वारे देण्यात आलेली नाही.

»BIKE4SALE ही देखील अशीच एक लोकप्रिय साईट आहे, या वेबसाइटने त्यांच्या साइटवर TVS ज्युपिटरचे 2015 वर्षाचे मॉडेल विक्रीसाठी सूचीबद्ध केले आहे. ज्यासाठी 20,000 रुपये किंमत निश्चित केली आहे परंतु या स्कूटरला दुसरी कुठलीच ऑफर दिलेली नाही.

English Summary: tvs jupiter scooter low cost second hand bike
Published on: 02 March 2022, 02:18 IST