Others News

बऱ्याच दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. परंतु मध्यंतरी काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या दरात दिलासा मिळतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी म्हणजे, खाद्यतेलाच्या दरात आणखी घट व्हावी,

Updated on 16 August, 2022 3:13 PM IST

 बऱ्याच दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता त्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली होती. परंतु मध्यंतरी काही दिवसांपासून खाद्य तेलाच्या दरात दिलासा मिळतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची बातमी म्हणजे, खाद्यतेलाच्या दरात आणखी घट व्हावी,

या दृष्टिकोनातून खाद्यतेलाच्या  किमतीबाबत मंगळवारी म्हणजे आज आयएमसीची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या होत असलेल्या बैठकीमध्ये तेलबियांची साठवणूक मर्यादा आणि एमआरपी यावर फेरविचार करण्यात येणार असून साठवणूक मर्यादा आणि पामतेल फ्युचर्स इत्यादींवर देखील चर्चा होणार असण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार; खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ

गेल्या शुक्रवारी अन्न सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली व या बैठकीत अन्न मंत्रालयाने सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या दराबाबत चर्चा केली.

या बैठकीत खाद्यतेलाची जी काही किंमत आहे ती लिटरमागे आठ ते पंधरा रुपयांनी कमी करण्यास सांगण्यात आले. टीआरक्यू कॉन्टिटी आणि पाम तेलाच्या फ्युचर्स ट्रेडींग बद्दल देखील चर्चा झाली.

नक्की वाचा:मोठी बातमी! MSP समितीच्या बैठकीची तारीख ठरली; शेतकऱ्यांसाठी होणार मोठा निर्णय

 या सगळ्या गोष्टींचा खाद्य तेलाच्या दरावर होणारा परिणाम काय होईल याबाबत देखील चर्चा झाली. सणासुदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढू नयेत या दृष्टिकोनातून सरकारचा प्रयत्न आहे.

तसेच  बैठकीत गव्हाच्या  आयातीवरील शुल्क देखील कमी करण्यावर विचार केला जाणार असून तांदळाच्या वाढत्या किमती आणि पेरणीचा कमी अंदाज पाहता संबंधित वस्तूंचा निर्यातीचे नियमन करणे बाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:पंतप्रधान मोदींचे लाल किल्ल्यावरून 81 मिनिटांचे भाषण: मोदींनी दिले देशवासीयांना 'हे' 5 महत्त्वाचे संकल्प

English Summary: todays important meeting of food ministry for edible oil prices
Published on: 16 August 2022, 03:13 IST